Jump to content

लेख टंडन

लेख टंडन (१३ फेब्रुवारी, १९२९:लाहोर, पाकिस्तान - १५ ऑक्टोबर, २०१७:पवई, मुंबई, महाराष्ट्र) हे हिंदी चित्रपटांत काम करणारे चित्रपट दिग्दर्शक, पटकथालेखक होते.

लेख टंडन यांना आपले वडील फकीरचंद टंडनचे सहाध्यायी पृथ्वीराज कपूर यांच्याकडून चित्रपटक्षेत्रात काम करण्याची प्रेरणा मिळाली.

टंडन हे चित्रपटसृष्टीत कृष्णधवल चित्रपटाच्या जमान्यापासून होते. त्यांनी दूरचित्रवाणी माध्यमातूनही काम केले. त्यांनी शाहरुख खानला संधी दिली.

टंडन स्वतःला दिग्दर्शक समजत असल्याने त्यांनी अभिनयासाठी निर्मात्याकडून कधीच मानधन घेतले नाही.

दिग्दर्शित केलेले चित्रपट

  • अगर तुमना होते
  • आम्रपाली
  • खुदा कसम
  • चेन्नई एक्स्प्रेस
  • झुक गया आसमान
  • दुल्हन वही जो पिया मन भाये
  • प्रिन्स
  • प्रोफेसर
  • रंग दे बसंती
  • स्वदेस

दिग्दर्शित केलेल्या दूरचित्रवाणी मालिका

  • दिल दरिया
  • फिर वही तलाश

पुरस्कार

  • सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी फिल्मफेर पुरस्कार