Jump to content

लेक्युन सेक्या बुद्ध

लेक्युन सेक्या बुद्ध
सर्वसाधारण माहिती
प्रकारपुतळा
ठिकाण खटाकन तैंग, मोण्वा, म्यानमार
बांधकाम सुरुवातइ.स. १९९६
पूर्ण २१ फेब्रुवारी २००८
ऊंची
वास्तुशास्त्रीय ११६ मीटर (३८१ फूट)
आधारासह : १२९ मीटर (४२३ फूट)
एकूण मजले ३१


लायक्युन सेक्य बुद्ध (बर्मीज: လေး ကျွန်း စင်္ ကြာ; इंग्रजी: Laykyun Sekkya Buddha) हा म्यानमारमधील एकूण ४२४ फूट (१२९ मीटर) उंच असलेला जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक उंच पुतळा आहे. हा बुद्ध पुतळा एकतीस मजल्यांचा आहे, ज्यामध्ये बौद्ध साहित्याप्रमाणे ३१ जीवनशैलींची ३१ रेषाकृती आहेत. प्रत्येक क्षेत्रासाठी प्रत्येक मजल्यातील भिंतीवरील चित्रे अतिशय मनोरंजक आणि लोकप्रिय आहेत. हा पुतळा पायथ्यापासून वर ३८१ फूट (११६ मीटर) उंच असून पायथ्याची (आसन) उंची ४४ फूट (१३.५ मीटर) आहे. गौतम बुद्धांचा हा पुतळा म्यानमार देशातील मोण्वाजवळील खटाकन तैंग या गावात स्थित आहे. याचे बांधकाम १९९६ पासून सुरू झाले व २१ फेब्रुवारी २००८ रोजी पुतळा पूर्ण करण्यात आला. हे चीफ अब्बोट वेन. नारडा यांनी सुरू केले. चीनमधील स्प्रिंग टेंपल बुद्ध नंतर हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा उंच बुद्ध पुतळा आहे. पुतळ्याचे बांधकाम २००८ मध्ये पूर्ण झाले.

चित्रदालन

हे सुद्धा पहा

संदर्भ

बाह्य दुवे