Jump to content

लेक पॅलेस

लेक पॅलेस पिंछोला सरोवरामध्ये,उदयपूर,भारत

भारताच्या उदयपूर येथील पिछोला सरोवरामध्ये ४ एकराच्या बेटावर लेक पॅलेस ( जग निवास या नावानं ओळखले जाणारे ) हे आलिशान हॉटेल आहे. [] या हॉटेलमध्ये ८३ खोल्या आणि कक्ष असून पांढ-या शुभ्र संगमरवरी दगडापासून मजबूत भिंती बांधलेल्या आहेत. सरोवराच्या किना-यापासून हॉटेलपर्यंतच्या प्रवासासाठी हॉटेलने एका बोटीची व्यवस्था केलेली आहे. संपूर्ण भारतात आणि जगामध्येसुद्धा हे रोमांचकारी ठिकाण म्हणून गणले जाते.





इतिहास

इ.स.१७४३ - १७४६ []च्या सुमारास राजस्थानच्या उदयपूरचे दुसरे महाराणा जगत सिंह ( मेवाड राजघराण्याचे ६२ वे वारसदार ) याच्या मार्गदर्शनाखाली उन्हाळयाच्या दिवसांत त्यांचे निवासस्थान म्हणून या महालाचे बांधकाम चालु केले. जगत सिंहाने बांधकाम केल्यामुळे हा महाल जग निवास या नावाने ओळखला जाउू लागला. निवासस्थानात राहणा-या रहिवाशांना पहाटे उठून सूर्यदेवाची पूजा करता यावी म्हणून या महाल पूर्वेकडे बांधलेला आहे. त्यानंतरच्या राज्यकर्त्यांनी या थंडगार जागेचा वापर उन्हाळी दिवसांत राहण्यायोग्य निवासस्थान म्हणून केला. नक्षीकाम केलेले खांब, कारंज्या, बागा, गच्च्या अशा रमणीय वातावरणात येथे दरबार भरविला जात असे.

जग मंदिर बेटपासून राजवाडाच्या आणि उदयपूर शहर सारखा संबंध बदलणारा देखावा


राजमहालातील वरील भागात २१ फूटाच्या (६.४ मीटर) गोलाकार खोल्या आहेत. संपूर्ण हॉटेलमध्ये पांढरे शुभ्र संगमरवरी तसेच रंगीबेरंगी दगड वापरून पानं, फुले, वर्तुळे इ.चे नक्षीकाम केलेले सर्वोत्तम असे गोलाकार घुमट बांधलेले आहे.[]

१८५७ मध्ये ब्रिटिश सैन्यातील हिंदी शिपायांनी केलेल्या बंडाच्या वेळी कित्येक युरोपियन कुटुंबिय परागंदा होवून या बेटाच्या आश्रयाला आले होते , त्यावेळी महाराणा स्वरूप सिंह यांनी त्या युरोपियन कुटुंबियांना या राजमहालामध्येआसरा दिला. बंडखोर त्यांच्यापर्यंत पोहोचू नयेत या हेतुने महाराजांनी किंना-यावरील सर्व बोटींचा नाश केला.[]

१९ व्या शतकाच्या मध्यापर्यंत मात्र या राजमहालाची रया हळूहळू कमी होवु लागली व या महालाचे रूपांतर एका बकाल वस्तीत होवू लागले.

लेक पॅलेसमध्ये लिली तळे, उदयपूर

महाराणा सर भोपाळ सिंहाच्या कालावधीमध्ये (१९३०-५५) या महालाबरोबरच चंद्रप्रकाश महालाची जबाबदारी सोपविण्यात आलेली असल्यामुळे जग निवास महालाकडे दुर्लक्ष होत गेले आणि त्याचे सौंदर्य लोप पावू लागले. पण त्यानंतरच्या काळात भगवत सिंह यांनी या राजमहालाचे रूपांतर उदयपूरच्या पहिल्या एैषआरामी हॉटेलमध्ये करण्याचे ठरविले.[] अमेरीकेतील कलाकार डीडी नावाच्या कंत्राटदाराने हॉटेलचा आराखडा तयार केला.

या हॉटेलचे बांधकाम एक रोमांचकारी अनुभव देणारे साहस असल्याचे या कलाकाराने नमूद केलेले आहे. हे बांधकाम पूर्णत्वाला नेताना अनेक संकटांचा सामना त्याला करावा लागला आणि खूप कमी भांडवलामध्ये हे त्याने शक्य करून दाखवले होते. या राजमहालामध्ये काम करणा-या ३०० नर्तकींचे काय करायचे हा मोठा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला होता. त्यावेळी त्याने त्या नर्तकींना नर्सच्या कामाचं प्रशिक्षण देण्याची तयारी दर्शविली होती. परंतु त्या शेवटपर्यंत महाल सोडायला तयार झाल्या नाहीत. त्या हॉटेलमध्ये राहून काही विशिष्ट प्रसंगामध्ये अजूनही त्या पारंपारिक लोकनृत्य सादर करत असतात.

१९७१ मध्ये ताज हॉटेलच्या मालकांनी टाटा समूहाने या हॉटेलचे व्यवस्थापनाचे काम हातात घेतले[] आणि ७५ खोल्या नवीन बांधून काढल्या. टाटा समूहाचे तरुण व्यवस्थापक जामशेड डी. एफ. लॅम यांनी या राजमहालाचे भूतकाळातील वैभव पुन्हा परत मिळवून देण्यासाठी सर्वोत्तम कारागिरांकडे कामगिरी सोपविली आणि या सगळयांनी केलेल्या अथक प्रयत्नांतून या राजमहालाचे ऐषआरामी आणि आलिशान हॉटेलमध्ये रूपांतरीत झाले.

२००० मध्ये या हॉटेलचे पुन्हा पर्नरचना करण्यात आली.

या हॉटेमध्ये काम करणारे ‘रॉयल बटलर’ पूर्वीपासून महालाच्या जागेची देखरेख करणा-यांचे वंशज आहेत. []

ट्रीव्हीआ

लॉर्ड कर्झन, विविन लिघ, राणी एलिझाबेथ, इराणचे शाह , नेपाळचे राजे आणि जॅकलिन केनेडी यासारख्या दिग्गजांनी या हॉटेलमध्ये पाहुणचार घेतलेला आहे.

या महालामध्ये खालील चित्रपटांचे चित्रीकरण करण्यात आलेले आहे.

  • १९५९ : फ्रीझ लँगचा ‘द टायगर ऑफ इश्नापूर’ आणि ‘द इंडियन थॉम्ब’
  • १९८३ : जेम्स बोन्डचा ‘ऑक्टोपसी’
  • १९८४ : ब्रिटिश दूरदर्शनवरील मालिका ‘द ज्वेल इन द क्राउुन’
  • २००१ : बॉलिवूडच्या सुभाष घईंचा ‘यादे’
  • २००६ : तारसेम सिंगचा ‘द फॉल’
  • ‘मेरा साया’ या चित्रपटाचे चित्रीकरण येथे झाले.
  • २०१३ : ‘ये जवानी है दिवानी’ याचे चित्रीकरण येथे झाले आहे.

संदर्भ

  1. ^ a b c "ताज लेक पॅलेस, उदयपूर" (इंग्लिश भाषेत). 2014-03-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-04-01 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ a b "जग निवास लेक पॅलेस, जग निवास पॅलेस इन उदयपूर इंडिया, लेक पॅलेस उदयपूर राजस्थान" (इंग्लिश भाषेत). 2012-09-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-04-01 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "ताज लेक पॅलेस" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ Warren, Page 60.