Jump to content

लेआंद्रो फेरनांदेथ दे मोरातीन

लेआंद्रो फेरनांदेथ दे मोरातीन स्पॅनिश नाटककार आणि कवी होते. ह्यांचा ज्न्म १० मार्च १७६० रोजी माद्रिद शहरी झाला. स्पॅनिश नाटककार आणि कवी निकोलस फेरनांदेथ दे मोरातीन हे त्याचे वडील .

कारकीर्द

एका सोनाराकडे काही काळ उमेदवारी केल्यानंतर पॅरिसमधील स्पॅनिश दूतावासात त्यांना नोकरी मिळाली.

‘द न्यू कॉमेडी’ (१७९२, इं. शी.) आणि द मेडन्स कन्सेंट (१८०६, इ. भा. १९६३) ही त्याची दोन नाटके प्रसिद्ध आहेत. ‘द न्यू कॉमेडी’ ह्या नाटकात तत्कालीन लोकप्रिय नाटकांतील दोषांवर उपरोधप्रचुर शैलीत त्याने बोट ठेवले आहे. वृद्ध विरुद्ध तरुण पिढी हा द मेडन्स कन्सेंटचा विषय असून जुन्या पिढीकडून गाजविल्या जाणाऱ्या अधिकारशाहीवर त्याने ह्या नाटकात टीका केली आहे. मोरातीनच्या वाङ्‌मयीन अभिरुचीवर फ्रेच साहित्यातील नव-अभिजाततावादाचा प्रभाव होता आणि फ्रेंच नव-अभिजाततावादी संकेत त्याने स्पॅनिश रंगभूमीवर आणले. तथापि स्पॅनिश नाटकांतून स्पॅनिश जीवनाचेच प्रमाणिक चित्रण केले जावे, अशी त्याची भूमिका होती. मोल्येर हा त्याचा आवडता नाटककार. त्याच्या नाट्यकृतींचे स्पॅनिश अनुवाद त्याने केले. शेक्सपिअरही त्याने स्पॅनिश भाषेत आणला. त्याने काव्यरचनाही केली आहे.

फ्रेंचांबद्दल त्याला असलेल्या सहानुभूतीमुळे १८१४ नंतरचे आपले आयुष्य त्याला बव्हंशी फ्रान्समध्येच काढावे लागले.

मृत्यू

पॅरिस शहरी ते २१ जून १८२८ रोजी निधन पावले.