Jump to content

लेंड अ हँँड इंडिया

लेंड अ हँँड इंडिया ही भारतातील राज्यांमध्ये ना-नफा तत्त्वावर काम करणारी संस्था आहे. ही संस्था न्यू यॉर्क येथील काही युवा व्यावसायिकांनी २००३ साली सुरू केली. या संस्थेचे मुख्यालय पुणे येथे आहे. त्याच बरोबर लंडन आणी न्यू यॉर्क येथेही संस्थेची अधिकृत कार्यालये आहेत. हि संस्था मुख्यतः माध्यमिक शिक्षणाची गुणवत्ता वाढवून बेरोजगारी सारखा प्रश्न सोडवण्यासाठी काम करते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये रोजगार संबंधी कौशल्ये निर्माण व्हावीत याकरता ही संस्था कार्यरत असते.


या संस्थेच्या संचालिका श्रीमती.सुनंदाताई माने या आहेत.