लुईस गॉर्डन प्यूग
लुइस गॉर्डन प्यूग | |
---|---|
जन्म | ५ डिसेंबर १९६९ प्लायमाउथ, इंग्लंड |
राष्ट्रीयत्व | ब्रिटिश |
शिक्षण | युनिव्हर्सिटी ऑफ केम्ब्रिज, युनिव्हर्सिटी ऑफ केप टाऊन |
पेशा | ब्रिटिश पर्यावरणविषयक कार्यकर्ता, सामुद्रिकी विषयातील वकील [श १] आणि लांब पल्ल्याचा जलतरणपटू[श २] |
वडील | सर्जन रिअर ॲडमिरल पी. डी. गॉर्डन प्यूग |
आई | मार्जरी प्यूग |
संकेतस्थळ lewispugh.com |
लुइस गॉर्डन प्यूग (इंग्लिश: Lewis Gordon Pugh) (५ डिसेंबर, इ.स. १९६९ - हयात) हा ब्रिटिश पर्यावरणविषयक कार्यकर्ता, सामुद्रिकी विषयातील वकील [श १] आणि लांब पल्ल्याचा जलतरणपटू[श २] आहे.
तो सर्व महासागरांमध्ये लांब पल्ल्याचे जलतरण (यामध्ये वेगापेक्षा अंतर अधिक महत्त्वाचे असते.) करणारा पहिला जलरणपटू आहे. [१] पर्यावरणाच्या दृष्टीने नाजूक असणाऱ्या ठिकाणी पोहून त्या प्रदेशातील पर्यावरणविषयक समस्यांकडे लक्ष्य वेधण्याचा त्याचा प्रयत्न असतो. आर्क्टिक प्रदेशातील वितळणाऱ्या बर्फाच्या प्रश्नाकडे जगाचे लक्ष्य वेधण्यासाठी तो इ.स. २००७ मध्ये उत्तर ध्रूवावर १ कि.मी. अंतर पोहून गेला. तसेच इ.स. २०१० मध्ये हिमालयातील वितळणाऱ्या हिमनद्या (glaciers) व त्यातून भविष्यात होणाऱ्या पिण्याचा पाण्याचा तुटवड्यामुळे जागतिक शांततेवर होणारा परिणाम याकडे प्रसारमाध्यमांचे तसेच देशांचे लक्ष्य वेधण्यासाठी तो हिमालयातील हिमनदी वितळून बनलेल्या तळ्यातून पोहून गेला.
इ.स. २०१० मध्ये जागतिक आर्थिक मंचाने यंग ग्लोबल लिडर म्हणून त्याचा गौरव केला. [२]
पारिभाषिक शब्दसूची
संदर्भ
- ^ जो स्प्रिंग. "जगातील सर्वोत्तम थंड पाण्यातील जलतरणपटू" (इंग्रजी भाषेत). 2010-08-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. जून ०३, इ.स. २०१२ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "यंग ग्लोबल लिडर्स २०१०" (इंग्रजी भाषेत). मार्च ३, इ.स. २०१० रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
बाह्य दुवे
- लुइस गॉर्डन प्यूगचे अधिकृत संकेतस्थळ
- माउंट एव्हरेस्टवर केलेल्या जलतरणावरील टेड टॉक
- उत्तर ध्रूवावरील जलतरणावरील टेड टॉक Archived 2014-02-22 at the Wayback Machine.