लुईझिएड द्वीपसमूह
लुईझिएड द्वीपसमूह हा पापुआ न्यू गिनीतील दहा मोठी ज्वालामुखीसदृश द्वीपे, त्यांच्या आसपासची प्रवाळी बेटे आणि इतर ९० प्रवाळी बेटांचा द्वीपसमूह आहे. हा द्वीपसमूह न्यू गिनीच्या आग्नेयेस २०० किमीवर असून अजून १६० किमीपर्यंत पसरलेला आहे. २६,००० किमी२ क्षेत्रात पसरेल्या या द्वीपसमूहात १,७९० किमी२ इतका भूप्रदेश आहे.
याच्या उत्तरेस सोलोमन समुद्र तर दक्षिणेस कॉरल समुद्र आहेत.
इतिहास
या द्वीपांवर मलय तसेच चिनी खलाशी आल्याचे उल्लेख आहेत. इ.स. १६०६मध्ये लुइस वाएझ दि तोरेसने ही द्वीपे लांबून पाहिली असल्याचा अंदाज आहे. इ.स. १७६८मध्ये लुई आंत्वान दि बोगनव्हिल याने या द्वीपसमूहाचे नाव फ्रांसच्या तत्कालीन राजा लुई पंधराव्याच्या (तसेच स्वतःच्याही) नावे लुईझिएड असे केले. येथे इ.स. १७९३मध्ये ॲडमिरल ब्रुनी दांत्रेकास्तू तसेच इ.स. १७६८मध्ये कॅप्टन ओवेन स्टॅनली यांनी भेट दिल्याची नोंद आॉहे.