ली वून-जी
ली वून-जी (कोरियन: 이운재 ; रोमन लिपी: Lee Woon-Jae ;) (एप्रिल २६, इ.स. १९७३ - हयात) हा दक्षिण कोरियाचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरुष फुटबॉल खेळाडू आहे. तो संघातील गोलरक्षकाची भूमिका बजावतो. दक्षिण कोरियातील के-लीग या फुटबॉल साखळी स्पर्धेत तो चुन्नाम ड्रॅगन संघातर्फे खेळतो. इ.स. १९९४, इ.स. २००२, इ.स. २००६ व इ.स. २०१० सालांतील फिफा विश्वकरंडक स्पर्धांमध्ये त्याने दक्षिण कोरियाचे प्रतिनिधित्व केले.
बाह्य दुवे
- के-लीग संकेतस्थळावरील ली वून-जी याची आकडेवारी[permanent dead link] (कोरियन मजकूर)
- दक्षिण कोरियाच्या राष्ट्रीय संघाच्या संकेतस्थळावरील ली वून-जी याची आकडेवारी (कोरियन मजकूर)
- फिफा.कॉम - ली वून-जी याची आकडेवारी Archived 2010-05-02 at the Wayback Machine. (इंग्लिश मजकूर)