Jump to content

ली क्वान यू

हे चिनी नाव असून, आडनाव ली असे आहे.
ली क्वान यू

सिंगापूरचे पहिले पंतप्रधान
कार्यकाळ
३ जून १९५९ – २८ नोव्हेंबर १९९०
मागील पदनिर्मिती
पुढील कोह चोक थोंग

सिंगापूरचा वरिष्ठ मंत्री
कार्यकाळ
२८ नोव्हेंबर १९९० – १२ ऑगस्ट २००४
मागील एस. राजरत्नम
पुढील कोह चोक थोंग

सिंगापूर संसद सदस्य
तांजोंग पगर साठी
कार्यकाळ
२ एप्रिल १९५५ – २३ मार्च २०१५

जन्म १६ सप्टेंबर १९२३ (1923-09-16)
सिंगापूर
मृत्यु २३ मार्च, २०१५ (वय ९१)
सिंगापूर
राजकीय पक्ष पीपल्स अ‍ॅक्शन पार्टी
धर्म अज्ञेयवाद

ली क्वान यू (ख्रिश्चन नाव: हॅरी, सोपी चिनी लिपी: 李光耀; फीन्यिन: Lǐ Guāngyào; रोमन लिपी: Lee Kuan Yew; १६ सप्टेंबर १९२३ - २३ मार्च २०१५) हा १९५९ ते १९९० सालांदरम्यान सिंगापुराच्या प्रजासत्ताकाचे पहिले पंतप्रधान असलेले राजकारणी होते. पंतप्रधानपदावर सर्वाधिक काळ अधिकारारूढ असलेल्या जगातल्या मोजक्या व्यक्तींपैकी ते एक होते.

ते पीपल्स अ‍ॅक्शन पार्टीचे सहसंस्थापक व पहिले सर्वसाधारण सचिव होते. तत्कालीन ब्रिटिश मलाया-सिंगापुरात इ.स. १९५९ साली झालेल्या निवडणुकींत पक्षनेतृत्व करत मोठ्या फरकाने पक्षास विजय मिळवून देण्यात त्यांनी मोठा वाटा उचलला. मलेशियापासून इ.स. १९६५ साली सिंगापूर अलग करण्यात आल्यावर त्यांनी सिंगापुराचे नेतृत्व सांभाळत नैसर्गिक साधनसंपत्तीची देणगी नसलेल्या एके काळच्या वसाहतीला कालौघात पहिल्या जगातील देशाचा दर्जा मिळवून दिला. इ.स.च्या २० व्या शतकाच्या उत्तरार्धात आग्नेय आशियातील राजकीय पटलावरील सर्वाधिक प्रभावशाली राजकारण्यांमध्ये ते गणला जात होते. २३ मार्च २०१५ रोजी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.

शिक्षण

ली याचं प्रार्थमिक शिक्षण तेलोक कुरौ इंग्रजी शाळेत झालं. ली यांनी १९४० साली शालांत प्रमाणपत्र परीक्षेत अव्वल क्रमांक पटकावला व बऱ्याच शिष्यवृत्ती सुद्धा मिळवल्या. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात १९४२ ते १९४५ दरम्यान जपानने सिंगापूरचा ताबा घेतला व त्यामुळे ली याचं शिक्षण रखडल. युद्ध संपल्यावर ली पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. ते लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स मध्ये दाखल झाले. पुढे त्यांनी केंब्रिजमधल्या फित्झविलियम कॉलेजमध्ये कायद्याचा अभ्यास केला.

राजकीय कारकीर्द (१९५१-१९५९)

वकील म्हणून काम करायच्या इराद्याने ली सिंगापूरला परतले. ली सिंगापूरला परतल्यावर एका कायदा सल्लागार फर्म मध्ये रुजू झाले. त्यांनी कायदा सल्लागार म्हणून व्यापार संगठना आणि विद्यार्थी संघटनांसाठी काम केल.

लोक कृती पक्षाची स्थापना

१३ मे १९५४ला राष्ट्रीय सेवा नियम कायद्याच्या विरोधात सिंगापूर शाळा संघटनेच्या सदस्यांनी साम्राज्यवादी सरकार विरोधी अहिंसक आदोलन सुरू केल. यावेळी पोलिसांनी आंदोलनाला हिंसक वळण देत ६० विद्यार्थ्यांना अटक केली. विद्यार्थांना झालेल्या अटकेमुळे ली हे डाव्या चळवळीचे वकील म्हणून नावारूपाला आले. १२ नोव्हेंबर १९५४ला लोक कृती पक्षाची स्थापना करण्यात आली. ली यांनी इंग्रजी शिकलेल्या मध्यम वर्गीय गटाला बरोबर घेऊन समाजवादी लोक कृती पक्षाची स्थापना केली व डाव्या चळवळीशी सलग्न असलेल्या व्यापारी संघटनानसोबत आघाडी केली.

पंतप्रधान, स्वातंत्र्यपूर्व (१९५९-१९६५)

३० मे १९५९ रोजी झालेल्या राष्ट्रीय निवडणुकीत लोक कृती पक्षाने सिंगापूर विधान सभेच्या ५१ पैकी ४३ जागांवर विजय मिळवला व सिंगापूरला संपूर्ण स्वयंशासित सरकार स्थापन करण्याचा अधिकार मिळाला. सिंगापूरला संरक्षण व विदेश संबंध हे दोन विभाग सोडून इतर सर्व बाबींमध्ये निर्णय घेण्याची स्वायत्तता बहाल करण्यात आली. ३ जून १९५९ला ली हे सिंगापुरचे पहिले पंतप्रधान झाले.

बाह्य दुवे

  • "सिंगापूर संसदेच्या संकेतस्थळावरील प्रोफाइल" (इंग्लिश भाषेत). 2010-02-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-09-22 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)