Jump to content

लिबरलायझेशन्स चिल्ड्रन (पुस्तक)

लिब्रलायजेशन्स चिल्ड्रेन: जेंडर, युथ अंड क्नज्युमर सिटीजनशीप इन ग्लोबलायजिंग इंडिया[] हे मानववंशास्त्रज्ञ रिटी. ए.लुकोस[] यांनी लिहिलेले पुस्तक आहे. सदर पुस्तक २०१० मध्ये ओरीयेंट ब्लॅक्स्वॅन यांनी प्रकाशित केले आहे. यामध्ये केरळ मधील मध्यम वर्गीय (non-elite) महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा लोकलेखापद्धतीने अभ्यास केला आहे.

महत्त्वाचे युक्तिवाद

भारतामध्ये कशाप्रकारे तरुण आणि लिंगभाव हे जागतिकीकरणाच्या राजकारणासाठी क्षेत्र बनतात याचे सखोल अभ्यास लीब्रलायझेशन्स चिल्ड्रेन यामध्ये केला आहे. लुकोस दाखवून देतात कि, कशाप्रकारे जागतिकीकरणावरील अस्वस्थता लिंगभाव राजकारणाचे अनेक प्रकार स्पष्ट करतात. या विस्तारित जनाच्या उपयुक्ततावादी संस्कृतीमध्ये स्त्रियांचे सार्वजनिक ठिकाणातील स्थान आणि लैंगिक शोषण घडवले जाते. पुरुषत्वाचे आणि स्त्रीत्वाचे अनेक प्रकार कि, ज्यातून तरुण लोक शिक्षणाचे सार्वजनिक अवकाश आणि एकूणच उपयुक्ततावादी संस्कृती (commodity culture)चालवतात याचा त्या आढावा घेतात. त्याचबरोबर त्या भारतातील आणि केरळमधील लिंगभाव विषयक ज्ञानाच्या उत्पादनासाठीच्या विविध स्थानांमध्ये मध्यस्थी करतात. पुस्तक अशा काही महत्त्वाच्या सांस्कृतिक व्यवहारांवर प्रकाश टाकते कि ज्याला तरुण लोक त्यांच्या जीवनाचे ग्रहणकर्ते आणि नागरिक समजतात.

सारांश

जागतिक भारतातील युवक, लिंगभाव आणि चंगळवाद याचा सखील अभ्यास करण्यासाठी केरळ हे क्षेत्र निवडण्यामागच्या कारणांचा आढावा पहिल्या प्रकरणामध्ये घेण्यात आला आहे. डावी राजकियतेच्या उद्यामागे ऐतिहासिकरित्या उच्च जातीमध्ये असलेले मातृवंशीय नातेसंबंध ही महत्त्वाची व्यवस्था केरळमध्ये असलेली दिसते. त्यामुळे केरळची याप्रकारची पार्श्वभूमी लेखिकेने रेखाटली आहे आणि त्याचबरोबर १९९० च्या दशकातील जागतिकीकरणाचा उदय आणि राष्ट्रीय स्थलांतर याविषयक मांडणी केलेली आहे.

दुसऱ्या प्रकरणामध्ये कशाप्रकारे उपभोगाचे नवे संच आणि ज्यावर युवक आणि युवती सार्वजनिक जीवनामध्ये दावे करतात त्याचे परीक्षण केले आहे. या उपभोगाच्या व्यवहारांचा प्रादुर्भाव विविध चालीरीती, पोशाख, चित्रपट आणि सौंदर्य साधनांवर झालेला दिसतो.

तिसऱ्या प्रकरणामध्ये आधुनिक प्रेमाच्या कथनांवर प्रकाश टाकला आहे. ही कथने स्त्रिया त्याचा शिक्षण आणि काम यामधील प्रवेश कशाप्रकारे समजून घेतात याविषयक मांडणी करते.

चौथ्या प्रकरणामध्ये विद्यार्थ्यांच्या राजकारणावर लक्ष केंद्रित केले आहे. यामध्ये विद्यार्थी राजकारणाच्या अवकाशाचे पुरुषी आधाराचे परीक्षण केले आहे कि जे वासाहतिक आणि उत्तर वासाहतिक विकासामध्ये दृढ झाले होते.

पाचव्या प्रकरणामध्ये शिक्षण आणि जात याविषयक मांडणी केली आहे. विशेषतः यामध्ये अस्मितेचे राजकारण आणि कनिष्ठ जातीय महाविद्यालयीन अवकाशातील धर्मनिरपेक्षता याविषयक सखोल अभ्यास करण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर समकालीन जात, समुदाय आणि धर्म यातील परिवर्तन कि ज्यावर हिंदू राष्ट्रवादामुळे परिणाम होत आहे याविषयकचे दृष्टीकोन समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

संदर्भ सूची