लिओ वराडकर
लिओ अशोक वराडकर (१८ जानेवारी, इ.स. १९७९:कॅसलनॉक, आयर्लंड - ) हे आयर्लंडचे पंतप्रधान आहेत. लिओ वराडकर यांचे वडील हे मूळचे महाराष्ट्रातील मुंबईचे आहेत. आयर्लंडच्या पंतप्रधान एंडा केनी यांनी मे २०१७मध्ये निवृत्ती घेतल्यावर फिने गेल या राजकीय पक्षाने वराडकर यांची आपल्या नेतेपदी निवड केली. जून २०१७मध्ये वराडकर यांना अधिकृतपणे पंतप्रधानपद मिळेल.
पक्षांतर्गत निवडणुकीत लिओ वराडकर यांनी सिमोन केव्हिने यांचा पराभव केला. लिओ यांना शेवटच्या फेरीत ७३ पैकी ५१ मते मिळाली.
आयर्लंडमध्ये २००७ साली झालेल्या निवडणुकांमध्ये वराडकर सर्वप्रथम तेथील संसदेत निवडून गेले. २०११मध्ये त्यांना मंत्रीपद मिळाले. २०१६नंतर ते आयर्लंडच्या पंतप्रधानपदाचे प्रमुख दावेदार मानले गेले.