लिओ मॅग्नस क्रिकेट संकुल
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | व्हान नुयेस, लॉस एंजेल्स , कॅलिफोर्निया |
गुणक | 34°10′53.14″N 118°28′32.36″W / 34.1814278°N 118.4756556°Wगुणक: 34°10′53.14″N 118°28′32.36″W / 34.1814278°N 118.4756556°W |
स्थापना | १९८० |
मालक | आर्मी कॉर्प्स ऑफ इंजिनियर्स |
प्रचालक | लॉस एंजेल्स शहर मनोरंजन आणि उद्याने विभाग |
यजमान संघ माहिती | |
दक्षिण कॅलिफोर्निया क्रिकेट असोसिएशन (१९८०) | |
शेवटचा बदल २४ ऑक्टोबर २०१६ स्रोत: लिओ मॅग्नस क्रिकेट संकुल, क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर) |
लिओ मॅग्नस क्रिकेट संकुल हे अमेरिकेमधील लॉस एंजेल्स, कॅलिफोर्निया स्थित व्हान नुयेस जिल्ह्यातील चार क्रिकेट मैदानांचे एक क्रिकेट संकुल आहे. सदर संकुल हे वूडली पार्क परिसरात असल्यामुळे वूडली क्रिकेट फिल्ड्स किंवा वूडली क्रिकेट संकुल म्हणून सुद्धा ओळखले जाते.
ह्या संकुलाचे नाव हे एक जमैकाचा क्रिकेट खेळाडू लियो "जिंगल्स" मॅग्नस ह्याच्या नावावरून दिले गेले आहे, जो युनिव्हर्सिटी क्रिकेट क्लबकडून सुद्धा खेळला होता. तसेच तो लॉस एंजेल्स क्रिकेट्स, शीनावे सेरेन्डिपिटी क्रिकेट क्लब आणि द कॉम्प्टन क्रिकेट क्लब या संघाचा प्रशिक्षक सुद्धा होता.