Jump to content

लिअँडर पेस

लिअँडर पेस
देश भारत
वास्तव्यकोलकाता
ओरलँडो, फ्लोरिडा
जन्म १७ जून, १९७३ (1973-06-17) (वय: ५१)
गोवा
उंची १.७८ मी (५ फु १० इं)
सुरुवात १९९१
शैली उजवा; एकहाती बॅकहॅन्ड
बक्षिस मिळकत ७५,९७,५३४ डॉलर्स
एकेरी
प्रदर्शन ९९ - ९८
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ७३ (२४ ऑगस्ट १९९८)
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपन २ फेरी (१९९७, २०००)
फ्रेंच ओपन २ फेरी (१९९७)
विंबल्डन २ फेरी (२००१)
यू.एस. ओपन ३ फेरी (१९९७)
दुहेरी
प्रदर्शन ७१४ - ३९०
अजिंक्यपदे ५५
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. (२१ जून १९९९)
ग्रँड स्लॅम दुहेरी
ऑस्ट्रेलियन ओपनविजयी (२०१२)
फ्रेंच ओपनविजयी (१९९९, २००१, २००९)
विंबल्डनविजयी (१९९९)
यू.एस. ओपनविजयी (२००६, २००९, २०१३)
मिश्र दुहेरी
अजिंक्यपदे १०
ग्रॅंड स्लॅम मिश्र दुहेरी
ऑस्ट्रेलियन ओपनविजयी (२००३, २०१०, २०१५)
फ्रेंच ओपनविजयी (२०१६)
विंबल्डनविजयी (१९९९, २००३, २०१०, २०१५)
यू.एस. ओपनविजयी (२००८, २०१५)
शेवटचा बदल: जून २०१६.


पदक माहिती
भारतभारत या देशासाठी खेळतांंना
ऑलिंपिक
कांस्य१९९६ अटलांटाएकेरी
राष्ट्रकुल खेळ
कांस्य२०१० दिल्लीपुरुष दुहेरी
आशियाई खेळ
सुवर्ण१९९४ हिरोशिमापुरुष दुहेरी
सुवर्ण१९९४ हिरोशिमापुरुष संघ
सुवर्ण२००२ बुसानपुरुष दुहेरी
सुवर्ण२००६ दोहापुरुष दुहेरी
सुवर्ण२००६ दोहामिश्र दुहेरी
कांस्य१९९४ हिरोशिमापुरुष एकेरी
कांस्य२००२ बुसानमिश्र दुहेरी

लिअँडर एड्रीयन पेस ( जून १७, १९७३) एक भारतीय व्यावसायिक टेनिसपटू आहे. लिअँडर सध्या ए.टी.पी. टूरमधील दुहेरी तसेच डेव्हिस करंडक स्पर्धांमध्ये टेनिस खेळतो. आजवर पुरुष दुहेरीमध्ये ८ तर मिश्र दुहेरीमध्ये १० ग्रँड स्लॅम स्पर्धांची अजिंक्यपदे मिळवणारा पेस हा जगातील सर्वोत्तम दुहेरी टेनिस खेळाडूंपैकी एक मानला जातो. सर्वाधिक वयामध्ये ग्रँड स्लॅम स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्याचा मान त्याच्याकडेच जातो. भारतामधील आजतागायतचा सर्वात यशस्वी टेनिस खेळाडू असलेल्या पेसला १९९६-९७ मध्ये राजीव गांधी खेल रत्न, १९९० मध्ये अर्जुन पुरस्कार तर २००१ साली पद्मश्री हे भारतामधील अनेक उच्च पुरस्कार मिळाले आहेत.

१५ ग्रँड स्लॅम विजेतेपदे मिळवण्यासोबतच पेस त्याच्या १९९६ अटलांटा ऑलिंपिक स्पर्धेमधील पुरुष एकेरीमध्ये कांस्यपदक मिळवण्यासाठी देखील प्रसिद्ध आहे. १९९२ ते २०१२ दरम्यान सलग सहा ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेला पेस हा एकमेव भारतीय खेळाडू तर जगातील एकमेव टेनिस खेळाडू आहे. इतर स्पर्धांमध्ये त्याने भारतासाठी अनेक पदके जिंकली आहेत. डेव्हिस करंडकासाठीच्या भारतीय संघाचा तो अनेक वर्षे कर्णधार होता. २०१० सालच्या विंबल्डन स्पर्धेमध्ये विजय मिळवून पेस रॉड लेव्हरखालोखाल तीन वेगवेगळ्या दशकांमध्ये विंबल्डन विजेतेपदे मिळवणारा दुसराच टेनिस खेळाडू ठरला. २०१० साली पेसने ऑलिंपिक गोल्ड क्वेस्ट ह्या गीत सेठीप्रकाश पडुकोण ह्यांनी स्थापन केलेल्या संस्थेमध्ये प्रवेश केला. भारतीय खेळाडूंना ऑलिंपिक स्पर्धांमध्ये पदके मिळवण्यासाठी प्रोत्साहन व प्रशिक्षण देणे व अधिकाधिक जागतिक दर्जाचे खेळाडू घडवणे हे ह्या संस्थेचे ध्येय आहे.

जीवन

लिअँडरचा जन्म १७ जून १९७३ रोजी गोव्यामध्ये झाला. लिअँडरचे दोघे पालक माजी खेळाडू आहेत. त्याचे वडील व्हेस पेस हे निवृत्त हॉकी खेळाडू असून ते १९७२ म्युनिक ऑलिंपिक स्पर्धेमध्ये कांस्यपदक मिळवणाऱ्या भारतीय हॉकी संघामध्ये होते. लिअँडरची आई जेनिफर पेस ही माजी बास्केटबॉल खेळाडू असून १९८२ साली तिने भारतीय बास्केटबॉल संघाचे नेतृत्व केले होते. १९व्या शतकामधील प्रसिद्ध बंगाली कवी मायकेल मधुसूदन दत्त हे जेनिफर पेसचे आजोबा होते. लिअँडरचे बालपण कलकत्त्यामध्ये गेले. कलकत्त्यामधील ला मार्तिनिये ह्या प्रसिद्ध शाळेमध्ये तसेच कोलकाता विद्यापीठातील सेंट झेव्हियर्स कॉलेज येथे त्याने शिक्षण घेतले. १९८५ साली लिअँडरने मद्रासमधील ब्रिटानिया अमृतराज टेनिस अकॅडमीमध्ये दाखला घेतला जेथे त्याचे टेनिस जीवन घडण्यास सुरुवात झाली. १९९० साली विंबल्डन स्पर्धेमधील ज्युनियर स्पर्धेमध्ये अजिंक्यपद मिळवून लिअँडर प्रसिद्धीझोतात आला.

बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी हिच्यासोबत काही काळ व्यतीत केल्यानंतर लिअँडरने मॉडेल रिया पिल्लई हिच्यासोबत विवाह केला. त्याला आयना पेस ही एक मुलगी आहे.

ग्रँड स्लॅम कारकीर्द

पुरुष दुहेरी: 16 (8–8)

२०१२ ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून पेसने पुरुष दुहेरीमधील ग्रँड स्लॅम पूर्ण केले.

निकाल वर्ष स्पर्धा कोर्ट जोडीदार प्रतिस्पर्धी स्कोर
उप-विजयी1999ऑस्ट्रेलियन ओपनहार्डभारत महेश भूपतीस्वीडन योनास ब्यॉर्कमन
ऑस्ट्रेलिया पॅट्रिक राफ्टर
3–6, 6–4, 4–6, 7–6(12–10), 4–6
विजयी1999फ्रेंच ओपनक्लेभारत महेश भूपतीक्रोएशिया गोरान इव्हानिसेविच
अमेरिका जेफ टॅरँगो
6–2, 7–5
विजयी1999विंबल्डनग्रासभारत महेश भूपतीनेदरलँड्स पॉल हारह्यूस
अमेरिका जॅरेड पामर
6–7(10–12), 6–3, 6–4, 7–6(7–4)
उप-विजयी1999यू.एस. ओपनहार्डभारत महेश भूपतीकॅनडा सेबास्तियन लारू
अमेरिका ॲलेक्स ओब्रायन
6–7, 4–6
विजयी2001फ्रेंच ओपन (2)क्लेभारत महेश भूपतीचेक प्रजासत्ताक पेत्र पाला
चेक प्रजासत्ताक पावेल विझ्नर
7–6, 6–3
उप-विजयी2004यू.एस. ओपनहार्डचेक प्रजासत्ताक डेव्हिड रिकलबहामास मार्क नौल्स
कॅनडा डॅनियेल नेस्टर
3–6, 3–6
उप-विजयी2006ऑस्ट्रेलियन ओपनहार्डचेक प्रजासत्ताक मार्टिन डॅमअमेरिका बॉब ब्रायन
अमेरिका माइक ब्रायन
6–4, 3–6, 4–6
विजयी2006यू.एस. ओपनहार्डचेक प्रजासत्ताक मार्टिन डॅमस्वीडन योनास ब्यॉर्कमन
बेलारूस मॅक्स मिर्न्यी
6–7(5–7), 6–4, 6–3
उप-विजयी2008यू.एस. ओपनहार्डचेक प्रजासत्ताक लुकास लूहीअमेरिका बॉब ब्रायन
अमेरिका माइक ब्रायन
6–7(5–7), 6–7(10–12)
विजयी2009फ्रेंच ओपन (3)क्लेचेक प्रजासत्ताक लुकास लूहीदक्षिण आफ्रिका वेस्ली मूडी
बेल्जियम डिक नॉर्मन
3–6, 6–3, 6–2
विजयी2009यू.एस. ओपन (2)हार्डचेक प्रजासत्ताक लुकास लूहीभारत महेश भूपती
बहामास मार्क नौल्स
3–6, 6–3, 6–2
उप-विजयी2010फ्रेंच ओपनक्लेचेक प्रजासत्ताक लुकास लूहीसर्बिया नेनाद झिमोंजिक
कॅनडा डॅनियेल नेस्टर
5–7, 2–6
उप-विजयी2011ऑस्ट्रेलियन ओपनहार्डभारत महेश भूपतीअमेरिका बॉब ब्रायन
अमेरिका माइक ब्रायन
3–6, 4–6
विजयी2012ऑस्ट्रेलियन ओपनहार्डचेक प्रजासत्ताक राडेक स्टेपानेकअमेरिका बॉब ब्रायन
अमेरिका माइक ब्रायन
7–6(7–1), 6–2
उप-विजयी2012यू.एस. ओपनहार्डचेक प्रजासत्ताक राडेक स्टेपानेकअमेरिका बॉब ब्रायन
अमेरिका माइक ब्रायन
3–6, 4–6
विजयी2013यू.एस. ओपन (3)हार्डचेक प्रजासत्ताक राडेक स्टेपानेकऑस्ट्रिया अलेक्झांडर पेया
ब्राझील ब्रुनो सोआरेस
6-1, 6-3

मिश्र दुहेरी: 18 (10–8)

निकाल वर्ष स्पर्धा कोर्ट जोडीदार प्रतिस्पर्धी स्कोर
विजयी1999विंबल्डनग्रासअमेरिका लिसा रेमंडरशिया अ‍ॅना कुर्निकोव्हा
स्वीडन योनास ब्यॉर्कमन
6–4, 3–6, 6–3
उप-विजयी2001यू.एस. ओपनहार्डअमेरिका लिसा रेमंडऑस्ट्रेलिया रेनेइ स्टब्स
ऑस्ट्रेलिया टॉड वूडब्रिज
6–4, 5–7, [11–9]
विजयी2003ऑस्ट्रेलियन ओपनहार्डअमेरिका मार्टिना नवरातिलोव्हाग्रीस एलेनी डॅनीलिदू
ऑस्ट्रेलिया टॉड वूडब्रिज
6–4, 7–5
विजयी2003विंबल्डन (2)ग्रासअमेरिका मार्टिना नवरातिलोव्हारशिया अनास्तासिया रोदियोनोव्हा
इस्रायल अँडी राम
6–3, 6–3
उप-विजयी2004ऑस्ट्रेलियन ओपनहार्डअमेरिका मार्टिना नवरातिलोव्हारशिया एलेना बोविना
सर्बिया आणि माँटेनिग्रो नेनाद झिमोंजिक
6–1, 7–6
उप-विजयी2005फ्रेंच ओपनक्लेअमेरिका मार्टिना नवरातिलोव्हास्लोव्हाकिया दानियेला हंटुचोवा
फ्रान्स फॅब्रिस सान्तोरो
3–6, 6–3, 6–2
उप-विजयी2007यू.एस. ओपनहार्डअमेरिका मेगन सॉनेसीबेलारूस व्हिक्टोरिया अझारेन्का
बेलारूस मॅक्स मिर्न्यी
6–4, 7–6(8–6)
विजयी2008यू.एस. ओपनहार्डझिम्बाब्वे कारा ब्लॅकअमेरिका लिझेल ह्युबर
युनायटेड किंग्डम जेमी मरे
7–6, 6–4
उप-विजयी2009विंबल्डनग्रासझिम्बाब्वे कारा ब्लॅकजर्मनी ॲना-लेना ग्रोनेफेल्ड
बहामास मार्क नौल्स
7–5, 6–3
उप-विजयी2009यू.एस. ओपनहार्डझिम्बाब्वे कारा ब्लॅकअमेरिका कार्ली गुलिक्सन
अमेरिका ट्रॅव्हिस पॅरट
6–2, 6–4
विजयी2010ऑस्ट्रेलियन ओपन (2)हार्डझिम्बाब्वे कारा ब्लॅकरशिया येकातेरिना माकारोव्हा
चेक प्रजासत्ताक यारोस्लाव लेविन्स्की
7–5, 6–3
विजयी2010विंबल्डन (3)ग्रासझिम्बाब्वे कारा ब्लॅकअमेरिका लिसा रेमंड
दक्षिण आफ्रिका वेस्ली मूडी
6–4, 7–6
उप-विजयी2012ऑस्ट्रेलियन ओपनहार्डरशिया एलेना व्हेस्निनाअमेरिका बेथनी मॅटेक-सँड्स
रोमेनिया होरिया तेकाउ
3–6, 7–5, [3–10]
उप-विजयी2012विंबल्डनग्रासरशिया एलेना व्हेस्निनाअमेरिका लिसा रेमंड
अमेरिका माइक ब्रायन
3–6, 7–5, 4–6
विजयी2015ऑस्ट्रेलियन ओपनहार्डस्वित्झर्लंड मार्टिना हिंगीसफ्रान्स क्रिस्टिना म्लादेनोविच
कॅनडा डॅनियेल नेस्टर
6–4, 6–3
विजयी2015विंबल्डन (4)ग्रासस्वित्झर्लंड मार्टिना हिंगीसऑस्ट्रिया अलेक्झांडर पेया
हंगेरी तिमेआ बाबोस
6-1, 6-1
Winner2015यू.एस. ओपन (2)हार्डस्वित्झर्लंड मार्टिना हिंगीसअमेरिका बेथनी मॅटेक-सँड्स
अमेरिका सॅम क्वेरी
6–4, 3–6, [10–7]
Winner2016फ्रेंच ओपनक्लेस्वित्झर्लंड मार्टिना हिंगीसभारत सानिया मिर्झा
क्रोएशिया इव्हान दोदिग
4–6, 6–4, [10–8]

संदर्भ आणि नोंदी

बाह्य दुवे