Jump to content

लाल डोक्याचा भारीट

लाल डोक्याची रेडवा

लाल डोक्याचा भारीट किंवा लाल डोक्याचा रेडवा (इंग्रजी: Red-headed Bunting; हिंदी: गन्दम) हा एम्बेरिझिडे या भारीट कुळातील पक्षी आहे.

ओळखण

हा सडपातळ रान चिमणीसारखा दिसणारा पक्षी आहे. याची लांब शेपटी दुभागलेली असते. नराचा खालचा भाग पिवळा, वरचा भाग हिरवा आणि तोंड व छाती लाल रंगाचे असते. मादीचा रंग वरून राखी आणि पाठीमागचा वर्ण पिवळा असतो. पिसाचा रंग गव्हाळी असून त्यावर पिवळी झाक असते.

वितरण

हे पक्षी भारतीय द्वीपकल्प व भारतीय उपखंडाचा भाग आणि पाकिस्तानात हिवाळी पाहुणे असतात. त्याचबरोबर पूर्वेकडे कोईम्बतूरपर्यंत व छोटा नागपूरमध्ये आढळतात.

निवासस्थाने

ते शेतीच्या प्रदेशात राहतात.

संदर्भ

पक्षीकोश - मारुती चितमपल्ली