लाल चकोत्री
लाल चकोत्री, भेरकी कोंबडी, कोकतर, कस्तूर, कोकोत्रा, छोटी रानकोंबडी किंवा कोकतर (इंग्लिश: Red Spurfowl; हिंदी:चकोतरी, छोटी जंगली मुर्गी) हा एक पक्षी आहे.
हा पक्षी आकाराने लहान कोंबडीएवढा असतो. मादी रंगाने नरापेक्षा वेगळी.नर वरून तांबूस उदी. त्यावर बारीक काळ्या काड्या व तिळाएवढे ठिपके.छाती पिवळट तांबूस रंगाची. त्यावर काळे ठिपके. नराच्या प्रत्येक पायाला २ ते ४ तीक्ष्ण आरी असतात. नर आणि मादीच्या डोळ्यांभोवती विटकरी लाल रंगाचा डाग. जोडीने किंवा थव्याने आढळून येतात.
वितरण
निवासी. भारतात ईशान्येकडील भाग, तसेच राजस्थान, उत्तर प्रदेश, नेपाळ तराई आणि बिहार. दक्षिणेकडे तामिळनाडू, कर्नाटक आणि उत्तर केरळ. गुजरातचा पश्चिम भाग आणि पालनपुर. ओरिसा, महाराष्ट्र आणि आंध्र. जानेवारी ते जून या काळात वीण.
निवासस्थाने
शुष्क आणि दमट पानगळीची झुडपी जंगले.
संदर्भ
- पक्षिकोश - मारुती चितमपल्ली