लार्ज हॅड्रॉन कोलायडर
लार्ज हॅड्रॉन कोलायडर बिग बँग यंत्र या नावाने प्रसिद्ध असलेल्या या वैज्ञानिक प्रयोगाने संपूर्ण जगाचे लक्ष बऱ्यावाईट कारणांनी वेधून घेतले आहे. सर्वात महत्त्वाकांक्षी वैज्ञानिक प्रयोग इथपासून त्सुनामी, भूकंप, कृष्णविवर, मानवजातीचा शेवट अश्या अफवांपर्यंत हा प्रयोग चर्चेत राहिला आहे.
हा प्रयोग फ्रान्स व स्वित्झर्लॅडच्या सीमेवर जमिनी खाली १७५ मीटरवर होत आहे. प्रयोगासाठी लागणारी प्रयोगशाळा २७ किमी लांबीची आहे.