लात्व्हियन सोव्हिएत साम्यवादी गणराज्य
लात्व्हियन सोव्हिएत साम्यवादी गणराज्य Латвийская Советская Социалистическая Республика (रशियन) Latvijas Padomju Sociālistiskā Republika | ||||
| ||||
| ||||
राजधानी | रिगा | |||
अधिकृत भाषा | लात्व्हियन, रशियन |
लात्व्हियन सोव्हिएत साम्यवादी गणराज्य (रशियन: Латвийская Советская Социалистическая Республика; लात्व्हियन: Latvijas Padomju Sociālistiskā Republika) हे भूतपूर्व सोव्हिएत संघाच्या १५ गणराज्यांपैकी एक गणराज्य होते.
१९१८ साली स्वतंत्र झालेल्या लात्व्हिया देशावर सोव्हिएत संघाने दुसऱ्या महायुद्धादरम्यान लष्करी आक्रमण करून हा भाग सोव्हिएत संघामध्ये विलिन केला. लात्व्हियाच्या संमतीनेच हे विलीनीकरण झाले आहे अशी रशियाची भूमिका होती. आंतरराष्ट्रीय समुदायाने मात्र ह्या घटनेचा निषेध करत हे विलीनीकरण बेकायदेशीय व अवैध ठरवले.
२५ डिसेंबर १९९१ रोजी सोव्हिएत संघाचे विघटन झाले व सोव्हिएत लात्व्हियाचे लात्व्हिया देशामध्ये रूपांतर झाले.