Jump to content

लातूर रोड

हे महाराष्ट्र मधील लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील एक गाव व मुख्य ठिकाण आहे.येथून लातूर शहरात लोहमार्ग आणि महामार्ग जातो म्हणुन या गावाला "लातूर रोड" असे नाव प्राप्त झाले आहे.गाव येथील रेल्वे जंक्शन साठी महाराष्ट्र भर प्रसिद्ध आहे. हे गाव चाकुर शहरापासून १ किमी अंतरावर वसलेले आहे. इथेच भक्त भाविकांचे श्रद्धास्थान असलेले हकानी बाबा बेट आहे.येथे श्री गोविंद बाबा यांची समाधी आहे. येथे रेल्वे जंक्शन असल्यामुळे इथे प्रवाशांची लगबग दररोज असते.हे लातूर जिल्ह्याचे मध्यवर्ती केंद्रस्थान आहे. रत्‍नागिरी - नागपूर या महामार्गावर वसलेले आहे. हे गाव येणाऱ्या ५ वर्षांत चाकुर नगरपंचायती मध्ये विलीन करण्यात येणार आहे. येथील रेल्वे स्थानकामुळे इथे व्यापाराला एक खुली बाजारपेठ प्राप्त झाली आहे.