लाख (पदार्थ)
लाख (लाख हा शब्द लाक्षा या संस्कृत शब्दापासून तयार झाला असावा) हा लाखेची कीड या किड्यांपासून मिळणारा पदार्थ आहे. साधारणता पिंपळ, वड, कुसुम, बोर, खैर, पळस, व या वर्गातील इतर वृक्षांवर ही कीड असते. ही कीड अत्यंत आकाराने सूक्ष्म असून ती कीड परपोशी असते. ती या वृक्षांचा रस शोषण करत असते व आपल्या संरक्षणासाठी तोंडातून एक प्रकारची लाळ सोडत असते. या लाळेचा कडक झालेला थर म्हणजेच लाळ होय.
उपयोग
लाखेचा उपयोग अनेक उद्योग धंद्यांमध्ये केला जातो. अलंकार आभूषणे बनवितांना ही लाखेचा उपयोग केला जातो. राजस्थानमध्ये फार पूर्वीपासून लाखेच्या बांगड्या व खेळणी बनवली जातात. लाखेचा उपयोग दस्तावेज सीलबंद करण्यासाठीही केला जातो. स्फोटकांच्या सुरक्षेसाठीही याचा उपयोग होतो. रंगकाम सध्या लाखेचा उपयोग मोठ्याप्रमाणावर केला जातो त्याच कारण म्हणजे याचा चकाकीपणा होय.
उत्पादन
लाख प्रामुख्याने जंगल संपतीमध्ये मोडतो. भारतामध्ये लाखेचे उत्पादन सर्वात जास्त होते. भारतासहित चीन, इंडोनेशिया, ब्रम्हदेश इ. देशांमध्ये उतपादन होते. भारतात जंगल क्षेत्र जास्त असलेल्या प्रदेशात लाखेचे उत्पादन होते तसेच यावर प्रक्रिया करण्यासाठीही अनेक ठिकाणी लाख परिष्करण केंद्रे आहेत. महाराष्ट्र राज्यात गोंदिया व गढचिरोलि या जिल्ह्यांमध्ये लाख उत्पादन घेतले जाते.