Jump to content

लाओझी

लाओझी (नामभेद : लाओ त्से, लाओ तू, लाओ-त्सू, लाओत्झे, लाओसी, लाओशिअस) (जन्म ख्रिस्तपूर्व सहावे शतक) हा प्राचीन चीनमधील एक तत्त्वज्ञ होता. ताओ ते चिंगचा कर्ता म्हणून तो सर्वाधिक प्रसिद्ध आहे. ताओ ते चिंगशी असलेल्या संबंधामुळे परंपरेने तो तात्त्विक ताओ धर्माचा संस्थापक मानला जातो.

लाओझीच्या ऐतिहासिक काळाविषयी आणि अस्तित्वाविषयी अभ्यासकांमध्ये मतभेद आहेत. असे असले तरी लाओझी चिनी संस्कृतीतील मध्यवर्ती व्यक्तिरेखा आहे.