लांगूदोक-रूसियों (फ्रेंच: Languedoc-Roussillon; ऑक्सितान: Lengadòc-Rosselhon; कातालान: Llenguadoc-Rosselló) हा फ्रान्स देशाचा एक भूतपूर्व प्रदेश आहे. हा प्रदेश फ्रान्सच्या दक्षिण भागात भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर वसला असून त्याच्या नैऋत्येला स्पेन व आंदोरा हे देश आहेत. माँतपेलिए ही लांगूदॉक-रोसियोंची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. लांगूदोक ह्या ऐतिहासिक फ्रेंच प्रांतापासून हा प्रदेश आखण्यात आला आहे.
२०१६ साली लांगूदोक-रूसियों व मिदी-पिरेने ह्या प्रदेशांना एकत्रित करून ऑक्सितानी ह्या नव्या प्रदेशाची निर्मिती करण्यात आली.
विभाग
खालील पाच विभाग लांगूदोक-रूसियों प्रदेशाच्या अखत्यारीत येतात.