Jump to content

ला सैबा

ला सैबा महापालिकेची इमारत

ला सैबा हे होन्डुरासच्या अतलांतिदा प्रांताचे राजधानीचे शहर आहे. हे शहर कॅरिबियन समुद्रात होन्डुरासच्या आखाताच्या किनारी आहे. याची स्थापना २३ ऑगस्ट, इ.स. १८७७ रोजी झाली. येथे आढळणाऱ्या सैबा वृक्षाचे नाव या शहरास देण्यात आले आहे. दरवर्षी मे महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या शनिवारी येथे कार्निव्हल असतो. त्यावेळी २ लाख वस्ती असलेल्या या शहरात ५ लाख पर्यटक भेट देतात.