Jump to content

ला नोचे त्रिस्ते

अस्तेक जग
अस्तेक समाजव्यवस्था

नाहुआत्ल्
अस्तेक दिनदर्शिका
अस्तेक धर्मव्यवस्था
अस्तेक पुराणे
अस्तेक संस्कृतीतील मनुष्यबळी
अस्तेक स्थापत्यशास्त्र
अझ्टेक तत्त्वज्ञान
कालपुल्ली

अस्तेकांचा इतिहास

अस्तलान
अस्तेक प्राचीन ग्रंथ
अस्तेक तिहेरी मित्रराष्ट्र
मेक्सिकोवरील स्पॅनिश पासदक्रांतन
ला नोचे त्रिस्ते
तेनोच्तित्लानचा पाडाव
हेर्नान कोर्तेझ

अस्तेक युद्ध

पुष्प युद्ध
अस्तेक योद्धा समाज
त्लाकोत्काल्कात्ल
काल्मेकाक

ह्युयी त्लातोआनी

तेनोच (?–१३७६)
अकामापिचत्लि (१३७६–१३९५)
वित्सिलिवित्ल् (१३९५–१४१७)
चिमालपोपोका (१४१७–१४२७)
इत्साकोआत्ल (१४२७–१४४०)
मॉतेक्सुमा, पहिला (१४४०–१४६९)
अक्सायाकाट्ल (१४६९–१४८१)
टिझोक (१४८१–१४८६)
अहुइट्झोट्ल (१४८६–१५०२)
मॉटेक्झुमा, दुसरा (१५०२–१५२०)
कुइट्लाहुआक (१५२०)
कुऔहटेमोक (१५२०–१५२१)

स्पॅनिशांचा मेक्सिकोवरील आक्रमणाच्यावेळी - एर्नान कोर्तेझची स्वारी अझ्टेक राजधानीमध्ये जवळपास नष्ट व्हायच्या बेतात असताना ते रात्री अझ्टेकांपासून बचावले आणि ट्लाक्सकालाला सुखरूप पोहोचले. स्पॅनिशांनी जिंकलेला मेक्सिको, ह्या ऐतिहासिक घटनेतील हा भाग ला नोचे ट्रिस्टे ("खिन्न रात्र") म्हणून ओळखला जातो.

प्रस्तावना

कोर्तेझची स्वारी नोव्हेंबर ८ १५१९ला अझ्टेक राजधानी टेनोच्टिटलानला येउन पोचली, त्यानंतर अझ्टेक ह्युयी त्लातोआनी मॉटेक्झुमा, दुसरा ह्याला पकडून कैद केले. नंतरच्या सहा महिन्यात कोर्तेझ आणि त्यांचे स्थानिक मित्रराष्ट्र ट्लाक्सकाल्टेका ह्या अनाहुत पाहुण्यांची टेनोच्टिट्लानमध्ये लक्षणीयरीत्या वाढ झाली.

जूनमध्ये आखातावरील किनाऱ्यावरून कोर्तेझला बातमी मिळाली की, क्युबाचा गव्हर्नर वेलाझ्क्वेझकडून कोर्तेझच्या शिरजोरीबद्दल कैद करण्यासाठी एक मोठे सैन्य पाठवून दिले आहे. आपला विश्वासू लेफ्टनंट पेद्रो दि अल्वारादोच्या हातात टेनोच्टिट्लानची जबाबदारी सोपवून कोर्तेझ किनाऱ्यावर गेला आणि पॅनफिलो दि नर्वाएझच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या स्पॅनिश सैन्याचा पराभव केला. जेव्हा कोर्तेझने हरलेल्या सैनिकांना सोन्याचे शहर - टेनोच्टिटलानबद्दल सांगितले, तेव्हा ते त्याला सामील होण्यास तयार झाले. त्याच्या (कोर्तेझच्या) गैरहजेरीत अल्वारादोने टेनोच्टिट्लानमधील मुख्य देवळात अनेक अझ्टेक खानदानी, प्रतिष्ठीत लोकांवर विनाकारण हल्ला चढवला, आणि त्याच्यापैकी डझनभर किंवा शंभर लोक मारले. (पहा: टेनोच्टिटलानमधील मुख्य देवळातील हत्याकांड).

जूननंतरच्या त्याच्या परत येण्यानंतर कोर्तेझला आढळले की, अझ्टेकांनी नवा ह्युयी ट्लाटोनी म्हणून कुइट्लाहुआकला निवडले. त्याच्यानंतर अझ्टेकांनी स्पॅनिश जेथे रहावयास उतरले, आणि मॉटेक्झुमाचा महालास वेढा दिला. कोर्तेझने मॉटेक्झुमास आज्ञा दिली की, त्याने महालाच्या सज्ज्यात उभे राहून स्पॅनिशांना किनाऱ्यावर शांततेने परतू देण्याबद्दल त्याच्या लोकांचे मन वळवावे. पण असे करताच मॉटेक्झुमाचा जमावाकडून उपहास केला गेला, तसेच जमावने त्याच्यावर दगडे, भाले फेकले. ह्या धक्क्याने मॉटेक्झुमा खाली पडला. त्यानंतर काही दिवसांनी मॉटेक्झुमाचा मृत्यू झाला. त्याच्या जखमांमुळे त्याचा मृत्यू झाला की स्पॅनिशांनी त्यास मारले ह्यांबद्दल वाद आहेत.

ला नोचे ट्रिस्टे

सतत हल्ल्यामुळे आणि अन्नपाण्याच्या तुटवड्यामुळे कोर्तेझने टेनोच्टिट्लान सोडण्याचा निश्चय केला. पहिल्यांदा त्याने आठ दगडी पायरस्त्यांवरील चार पूल काढून टकून त्याजागी, सहज हलवता येतील अश्या पूलांची योजना केली. सोने आणि अझ्टेकांकडून जमवलेली लूटीची आवरावर सुरू झाली. प्रत्येक स्पॅनिशांनी आपणांस पेलवेल इतके सोने भरून घेतले. जुलै १ १५२०ला त्याच्या सैन्याने टेनोच्टिट्लान सोडून पश्चिमेला ट्लाकोपानकडे जाणाऱ्या रस्त्याकडे प्रयाण केले. हा रस्ता वरवर पहाता पहारेकरी नसलेला दिसत होता, स्पॅनिशांनी निघताना सर्व ठीकठाक असल्याची खात्री करून घेतली नाही, त्यांना वाटत होते की ते झोपलेल्या शहरातून बाहेर पडत आहेत. पायरस्त्यावर पोहोचण्यापूर्वीच त्यांनी काही अझ्टेकांना रणशिंग फुंकताना पाहिले.

त्यानंतरचे युद्ध भयानक पद्धतीने चालले. स्पॅनिश आणि त्यांचे मित्रराष्ट्र सैनिक रस्त्यावर पोहोचताच पाण्यावर शंभरावर पडाव दृश्यमान झाले. स्पॅनिश आणि ट्लाक्सकाल्टेक पावसात त्यांच्या मार्गावरून जाण्याचा प्रयत्‍न करता करता लढत होते. काहीकाहीवेळा मध्ये फट मिळताच हलवता पूल लावून त्यावरून जाण्याचा प्रयत्‍न करीत होते. जरी युद्ध चालले असले तरी मध्ये भग्नावशेष आणि मृतदेह ह्यांच्यामुळे युद्धात काही जागी खिंडार पडत होती, त्यामुळे हलवता पूल लावून पुढे जाता येत होते. काही ठिकाणी सोन्याच्या वजनामुळे बरेच काँकुसिडोर पाण्यात बुडाले.

कोर्तेझ फक्त हरवलेल्या - नष्ट झालेल्या सैनिकांपैकी १५० स्पॅनिश आणि २,००० मित्रराष्ट्र सैनिकांवर ताबा मिळवू शकला. काही प्राथमिक स्त्रोतांपीकी थोआन कॅनोच्या उल्लेखाप्रमाणे ११५० स्पॅनिश मेले (बहुतकरून एकूणेक स्पॅनिश सैनिकांच्या संख्येपेक्षा ही संखा जास्त होती). फ्रांसिस्को लोपेझ दि गोमारा ह्या कोर्तेझच्या खाजगी धर्मोपदेशकाच्या मते ४५० स्पॅनिश आणि ४,००० मित्रराष्ट्र सैनिक मृत्यू पावले. स्त्रोतांच्या उल्लेखांप्रमाणे एकही जखमी नसलेला सैनिक आढळला नाही. कोर्तेझ, अल्वारादो आणि हुशार असलेल्या माणसांनी कौशल्याने लढत टेनोच्टिट्लान बहेर पडले. कोर्तेझची पत्‍नी मरिया एस्त्रादा, अल्वारादोची पत्‍नी ला मलिंचे आणि मोक्टेझुमाच्या दोन मुली ह्यांप्रमाणे स्त्रिया बचावल्या.

उपसंहार

झुंपांगो तलावाच्या उत्तरेला शेवट होतो, तेथपर्यंत युद्ध चालू राहिले आणि स्पॅनिशांनी प्रतिकराचा प्रयत्‍न केला. दोन आठवड्यानंतर टेओटिहुआकानपासून जवळ असलेल्या ओटुंबामधील युद्धात त्यांनी पिछ्छा करणाऱ्या अझ्टेकांचा खत्रीलायक पराभव केला - कोर्तेझच्या म्हणण्याप्रमाणे तसे घडले कारण, त्याने अझ्टेक सैनिकाचे नेतृत्व करणाऱ्यास मारले - त्यामुळे स्पॅनिशांस विश्रांती मिळून ते ट्लाक्सकालाला पोहोचले. येथेच कोर्तेझने टेनोच्टिट्लानला वेढा घालण्याचा आराखडा आणि अझ्टेक साम्राज्याच्या नाशाची योजना तयार केली.

सूची

ला नोचे ट्रिस्टे - la Noche Triste

हेर्नान कोर्तेझ - Hernán Cortés^

स्पॅनिश - Spanish

स्पॅनिशांनी जिंकलेला मेक्सिको - Spanish conquest of Mexico

ह्युयी ट्लाटोवानी - Hueyi Tlatoani

मॉटेक्झुमा, दुसरा - Moctezuma II/Montezuma II^^

ट्लाक्सकाला - Tlaxcala

टेनोच्टिटलान - Tenochtitlan

ट्लाक्सकाल्टेका - Tlaxcalteca

गव्हर्नर वेलाझ्क्वेझ - Governor Velázquez^

(दियेगो वेलाझ्क्वेझ दि क्वेयार - Diego Velázquez de Cuéllar)^

पेद्रो दि अल्वारादो - Pedro de Alvarado^

पॅनफिलो दि नर्वाएझ - Pánfilo de Narváez^

कुइट्लाहुआक - Cuitláhuac

ट्लाकोपान - Tlacopan

पडाव - Canoe

ट्लाक्सकाल्टेक - Tlaxcaltec

काँकुसिडोर - Conquistadore

थोआन कॅनो - Thoan Cano^

फ्रांसिस्को लोपेझ दि गोमारा - Francisco López de Gómara^

मरिया एस्त्रादा - María Estrada^

ला मलिंचे - La Malinche^

झुंपांगो तलाव - Lake Zumpango

टेओटिहुआकान - Teotihuacan

ओटुंबामधील युद्ध - Battle of Otumba

^ स्पॅनिश उच्चारांप्रमाणे "t" व "d"च्या जागी "त" आणि "द"ची योजना केलेली आहे. ही नावे स्पॅनिश उच्चारांप्रमाणे लिहिले आहेत. काही शंका असल्यास चर्चा पानावर चर्चा करा.

^^ मूळ अझ्टेक नाव मोटेक्झुमा असून त्याचा स्पॅनिश, पर्यायाने इतर भाषेत अपभ्रंश होऊन ते Moctezuma व Montezuma असे लिहिले जाते.

हे सुद्धा पहा

  • अझ्टेक इतिहास
  • मेक्सिकोचा इतिहास

बाह्य दुवे