लहूगड
लहुगड नांद्रा
औरंगाबादहूनसिल्लोडला जाताना १५ किलोमीटरवर चौका गाव लागते. तेथून डाव्या बाजूच्या रस्त्याने १८ किलोमीटरवर लहुगड नांद्रा आहे. हे रामेश्वर महादेवाचे ठिकाण. महादेवाचे हेमाडपंती मंदिर असून ते डोंगराच्या मधोमध कोरलेले आहे. एका आख्यायिकेप्रमाणे येथे सीतेचे वास्तव्य होते. रामायणातील लव-कुश यांचे जन्मस्थळ म्हणूनही हे ठिकाण ओळखले जाते. येथे पाण्याच्या टाक्या, लेणी आहेत.