Jump to content

लहान बगळा

लहान बगळा
शास्त्रीय नाव इग्रेटा गार्झेटा
(Egretta garzetta)
कुळ बकाद्य
अन्य भाषांतील नावे
इंग्लिश लिटल इग्रेट
(Little Egret)
संस्कृत बलाकिका
हिंदी करछिया बगुला

लहान बगळा ,छोटा बगळा किंवा मोरबगळा(शास्त्रीय नाव: Egretta garzetta ; इंग्लिश: Little Egret, लिटल इग्रेट) हा आकाराने लहान बगळा आहे. याचे वैष्यिष्ट्य म्हणजे हा दिसायला संपूर्णतः पांढरा असतो व याची चोच काळ्या रंगाची असते. विणीच्या हंगामात नर बगळ्याला मानेपाशी अत्यंत सुरेख तुरा येतो. गाय बगळा व लहान बगळा यांतला फरक ओळखणे अवघड असते. मुख्यत्वे चोचीच्या रंगावरून त्यांच्यामधला फरक ओळखता येतो. लहान बगळ्याची चोच काळी असते, तर गाय बगळ्याची चोच पिवळी असते.