Jump to content

लसूण वेल

Mansoa alliacea, किंवा लसूण वेल एक उष्णदेशीय वनस्पतींची प्रजाती आहे. ही इतर वृक्षांवर चढणारी एक प्रकारची वेल असते. या वेलीचे मूळ उत्तर दक्षिण अमेरिकेचे आहे.[] आणि पुढे तिचा प्रसार मध्य अमेरिका आणि ब्राझीलमध्ये झाला आहे.[] अ‍ॅमेझॉन रेनफॉरेस्टच्या मेस्टीझोसमध्ये या वेलीला अजो सचा, स्पॅनिश-क्वेचुआ नावाने ओळखले जाते, ज्याचा अर्थ "जंगली लसूण" आहे.

मानसोआ अलियासिआची परदेशात निर्यात केली गेली आहे, आणि पुर्टो रिको, दक्षिण आफ्रिका, थायलंड आणि भारत यांच्या अनुकूल हवामानात वाढते. [] [] वेस्ट इंडीजमध्ये याची लागवड केली जाते. []

ओसाका, जपानमधील बोटॅनिकल गार्डनमधील साकुया कोनोहाना कान येथे लसूण वेलीची लागवड केली.

औषधी गुणधर्म

लसूण वेलीचा उपयोग औषधी म्हणून अमेझोनच्या खोऱ्यात खूप काळापासून स्थानिक लोकांकडून केला जातो. आधुनिक वैद्यकशास्त्रानेही लसूण वेलीच्या सर्वच भागांमध्ये औषधी गुणधर्म आणि रसायने असल्याचेही मान्य केलेले आहे. सामान्य लसूणाला संपूर्णपणे पर्याय म्हणून लसूण वेलीच्या पानांचा आणि फ़ुलांचा वापर औषधात आणि पाककृतींमध्येही केला जातो []

संदर्भ

  1. ^ a b Liogier, Alain H.; Martorell, Luis F. (2000). Flora of Puerto Rico and Adjacent Islands: A Systematic Synopsis (Revised second ed.). San Juan: Editorial de la Universidad de Puerto Rico. p. 186. ISBN 0-8477-0369-X. OCLC 40433131. 22 January 2014 रोजी पाहिले.
  2. ^ Sheat, William G.; Schofield, Gerald (1995). Complete Gardening in Southern Africa (Second ed.). Cape Town: Struik. p. 301. ISBN 9781868257041. OCLC 34793018. 22 January 2014 रोजी पाहिले.
  3. ^ "Mansoa alliacea (Lam.) A. H. Gentry" Archived 2017-05-17 at the Wayback Machine.. Germplasm Resources Information Network (GRIN). Agricultural Research Service (ARS), United States Department of Agriculture (USDA). Retrieved 15 June 2012.
  4. ^ Salim, E. I. (8 April 2012). "Garlic Vine (Mansoa alliacea)". Raxa Collective. 8 October 2012 रोजी पाहिले.
  5. ^ Salazar, Angélica Tasambay; Scalvenzi, Laura; Lascano, Andrea Piedra; Radice, Matteo (2017-10-10). "Ethnopharmacology, biological activity and chemical characterization of Mansoa alliacea. A review about a promising plant from Amazonian region" (इंग्रजी भाषेत). doi:10.3390/mol2net-03-04617. Cite journal requires |journal= (सहाय्य)