लसणे
लसणे हे एक मराठी आडनाव असून या आडनावाची माणसे प्रामुख्याने तुळजापूर या गावी पूर्वीपासून रहात असल्याचे आढळते. लसणे हे यजुर्वेदी शाखेचे देशस्थ ब्राह्मण आहेत. लसणे परिवार हा तुळजापूर येथे तुळजाभवानी देवीची पूजा तसेच इतर धार्मिक विधी परंपरागतरीत्या करत आला आहे. लसणे आडनावाच्या लोकांची कुलदेवी साक्षात तुळजाभवानी तर अणदूर येथील खंडोबा हा त्यांचा कुलदेव आहे. आज, इ.स. २०१३मध्ये तुळजापूर येथे ८पेक्षा अधिक लसणे आडनावाची कुटुंबे राहत आहेत. या कुटुंबांची बहुतांश घरे तुळजापूरच्या मंकावती गल्ली येथे आहेत. वे.शा.सं.कै. शंकरभट भवानीदास लसणे हे लसणे घराण्याचे पूर्वज होत. वासुदेव, अंबादास, कालिदास व दुर्गादास ही त्यांची चार मुले होत . भटभिक्षुकी करणे हा लसणे परिवाराचा प्रमुख व्यवसाय असून हा व्यवसाय लसणे घराण्याच्या पुढील पिढ्यांनी जतन केला आहे.