ललिता पवार
भारतीय अभिनेत्री | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
उच्चारणाचा श्राव्य | |||
---|---|---|---|
स्थानिक भाषेतील नाव | ललिता पवार | ||
जन्म तारीख | एप्रिल १६, इ.स. १९१६ नाशिक | ||
मृत्यू तारीख | फेब्रुवारी २४, इ.स. १९९८ पुणे | ||
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
कार्य कालावधी (अंत) |
| ||
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय |
| ||
उल्लेखनीय कार्य |
| ||
पुरस्कार |
| ||
| |||
ललिता पवार (१८ एप्रिल १९१६, नाशिक - २४ फेब्रुवारी १९९८, पुणे) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री होती. सुरुवातीच्या काळात मराठी चित्रपटसृष्टीमध्ये नायिकेच्या भूमिका करणाऱ्या ललिता पवार यांनी नेताजी पालकर, संत दामाजी, अमृत, गोरा कुंभार इत्यादी यशस्वी मराठी चित्रपटांमध्ये कामे केली होती. त्यानंतर त्यांच्या डोळ्याला इजा झाल्यानॆ त्यांना बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये खलनायिकेच्या भूमिका कराव्या लागल्या. दूरदर्शनवरील रामायण या मालिकेमध्ये त्यांनी मंथरेची भूमिका केली होती.
वयाच्या १२ वर्षापासून चित्रपटांत काम करणाऱ्या ललिता पवार यांची विक्रमी सिनेकारकीर्द एकूण ७० वर्षांची आहे. त्यांनी सुमारे ७०० चित्रपटांत भूशा भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री. त्यांचा जन्म नाशिकजवळील येवला येथे झाला. त्यानंतर त्यांचे पुढील वास्तव्य इंदूर आणि पुणे येथे होते. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव अंबिका लक्ष्मण सगुण. त्यांचे वडील लक्ष्मण सगुण हे व्यापारी होते. ललिताबाईंचे शिक्षण प्राथमिक शाळेपर्यंत झाले. त्यानंतर त्यांनी मूकपटात बालकलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली.
१९२८ साली आर्यमहिला या मूकपटात त्यांना भूमिका मिळाली. त्यानंतर गनिमी कावा (१९२८), जी. पी. पवारदिग्दर्शित ठकसेन राजपुत्र (१९२९), समशेर बहादूर (१९३०), चतुर सुंदरी (१९३०), पृथ्वीराज संयोगिता (१९३०), दिलेर जिगर (१९३१) इ. मूकपटांत त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका केल्या. पुढे बोलपटांची सुरुवात झाल्यानंतर त्यांना बोलपटातही चांगली कामे मिळू लागली. मुंबईच्या चंद्र आर्ट्सच्या हिम्मते मर्दा (१९३५) या बोलपटात त्या नायिका होत्या. या चित्रपटाचे नायक मास्टर भगवान होते. हाच त्यांचा मुख्य भूमिका असलेला पहिला बोलपट. हा चित्रपट खूप गाजला. या चित्रपटाचे दिग्दर्शक गणपतराव पवार होते.
१९३८ मध्ये टॉलस्टॉयच्या रेसरेक्शन या कादंबरीवरून दुनिया क्या है? (१९३८) ह्या चित्रपटाची निर्मिती ललिताबाईंनी केली आणि त्यात भूमिकाही केली. त्यातील गाणी त्यांनी स्वतःच म्हटली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांचे पती गणपतराव पवार यांनीच केले होते. भालजी पेंढारकरलिखित-दिग्दर्शित अरुण पिक्चर्सच्या नेताजी पालकर (१९३९) या चित्रपटात काशी या नायिकेची भूमिका त्यांनी प्रभावीपणे वठविली. हा त्यांचा पहिला मराठी बोलपट. एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अनवधनाने घडलेल्या अपघातामुळे त्यांना चेहऱ्याच्या पक्षाघाताचा आजार झाला व या आजारपणात त्यांचा एक डोळा अधू झाला. परिणामी त्यांना चित्रपटांमध्ये नायिकेच्या भूमिका मिळणे बहुतांशी बंद झाले. पुढे त्यांनी चित्रपटांमध्ये चरित्र भूमिका साकारण्यास सुरुवात केली. त्यांच्या महत्त्वाच्या भूमिका असलेले मराठी चित्रपट म्हणजे अमृत (१९४२), गोरा कुंभार, जय मल्हार (१९४७), रामशास्त्री (१९४४), अमर भूपाळी (१९५१), मानाचं पान (१९५०), चोरीचा मामला (१९७६) हे होत. प्रभातच्या रामशास्त्री या चित्रपटात त्यांनी महत्त्वाकांक्षी, निष्ठूर आणि करारी स्वभावाच्या आनंदीबाईंची भूमिका केली होती.
ललिताबाईंना अनाडी चित्रपटातील डिसा या भूमिकेकरिता फिल्मफेअरचा साहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला (१९६०). त्यांना १९६१ साली संगीत नाटक अकादेमी पुरस्कार व १९७७ साली महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त झाला. गृहस्थी, सजनी, अनाडी, घर बसा के देखो या चित्रपटांतील उत्कृष्ट भूमिकांबद्दल त्यांना विविध पुरस्कार मिळाले.
मूकपटापासून बोलपटापर्यंतच्या सु. सात दशकांच्या प्रदीर्घ कालखंडात चित्रपटसृष्टीत टिकून राहिलेल्या ललिता पवार चरित्रनायिका म्हणून विशेष लक्षात राहतात.
ललिताबाईंचा विवाह दिग्दर्शक गणपतराव पवार यांच्याशी झाला. पण हे विवाहबंधन फार काळ टिकले नाही. त्यांचा दुसरा विवाह निर्माते राजप्रकाश गुप्ता यांच्याशी झाला.
आयुष्याच्या उत्तरार्धात ललिताबाईंना तोंडाचा कर्करोग झाला होता. यामुळे त्यांची प्रकृती खूप खालावली. त्यातच त्यांचे पुणे येथे एकाकी अवस्थेत निधन झाले.
समीक्षक : श्यामला वनारसे
- फिल्मफेअर पुरस्कार
- १९५९ - सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री - अनाडी
- संगीत नाटक अकादमी पुरस्कार - १९६१
बाह्य दुवे
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील ललिता पवार चे पान (इंग्लिश मजकूर)