ललिता गादगे
प्रा.ललिता गादगे या मराठवाड्यातील कथा लेखिका आहेत. त्यांचा जन्म कर्नाटकमधील बिदर या महाराष्ट्र सीमेवरच्या जिल्ह्यात, औराद तालुक्यातील रक्षाळ या गावी झाला. नोकरीच्या निमित्ताने त्यांचे अहमदपूर जि.लातूर येथे वास्तव्य असते.त्या महात्मा गांधी महाविद्यालयात इंग्रजी विषयाच्या प्राध्यापक आहेत. लघुकथांखेरीज त्यांनी कविता, ललितगद्य, अनुवाद, समीक्षा असे वाड्मयीन प्रकार हाताळले आहेत.त्यांचे लेखन लोकसत्ता मधून प्रसिद्ध झाले आहे.
ललिता गादगे यांची प्रकाशित पुस्तके
कवितासंग्रह
- ‘अग्निजळ’ (१९९४)
- ‘फसवी क्षितिजे’ (१९९१)
- ‘संवेदन’ (२००८)
कथासंग्रह
- ‘आयुष्याच्या काठाकाठाने’ (१९९१)
- ‘दुःख आणि अश्रू’ (१९९५)
- ‘प्राजक्ताची फुले आणि दाह’ (२००२)
ललित गद्य
- ‘अंतरीचे धावे’ (आगामी)
- ‘खिडकीतील आभाळ’ (२००६)
- ‘नाळबंधाची कहाणी’ (२००२)
अनुवाद
- ‘द विनर स्टॅण्ड्स अलेान’ (अनुवादित कादंबरी; मूळ इंग्रजी लेखक पाउलो कोएलो) (२०१३)
- ‘ईस्टोराइन ईरालू’(आगामी) (नागालँडच्या लेखिकेच्या ‘अ टेरिबल मॅट्रिॲर्की’ या कादंबरीचा अनुवाद)
पुरस्कार आणि सन्मान
- ‘फसवी क्षितिजे’, ‘अग्निजळ’ काव्यसंग्रहास महाराष्ट्र राज्य शासनाचा उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार.
- ‘दुःख आणि अश्रू’ कथासंग्रहास कै. नरहर कुरुंदकर आणि बी. रघुनाथ पुरस्कार.
- ‘खिडकीतलं आभाळ’ ललित लेखास गुणीजन साहित्य संमेलन पुरस्कार.
- ‘प्राजक्ताची फुल आणि दाह’ कथासंग्रहास, ग्रामीण राज्यपुरस्कार, रोहिणी वाकडे पुरस्कार.
- ‘नाळबंधाची कहाणी ललित लेखास, प्रसाद बन वाड्मय पुरस्कार.
- २००६ला ‘सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका’ पुरस्कार प्राप्त.
- सिंधफणानगरी (माजलगाव) येथे १-२ फेब्रुवारी २०१४ या काळात झालेल्या ५व्या मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.