ललित गोल्फ आणि स्पा रिसोर्ट
ललित गोल्फ आणि स्पा रेसोर्ट हे रेसोर्ट ललित सुरी हॉस्पिटॅलिटी ग्रुपच्या मालकीचे आहे.
ललित सुरी हॉस्पिटॅलिटी ग्रुप हा भारतातील सगळ्यात मोठी आणि वेगाने वाढणारी हॉटेल कंपनी भारत हॉटेल्स लिमिटेडचा उपक्रम आहे.[१]
हॉटेलच्या लॉबीमध्ये केलेले पोर्तुगीज शैलीचे नक्षीदार काम असलेले ललित गोल्फ आणि स्पा रेसोर्ट दक्षिण गोवाच्या पश्चिम किनाऱ्यावरील ८६ एकरात पसरलेले ५ स्टार हॉटेल आहे.[२] लोकांच्या म्हणण्यानुसार हे हॉटेल आरामासाठी तसेच बिजनेस ट्रीपसाठीसुद्धा योग्य आहे. सूर्यास्त बघण्यासाठी खाजगी नौका, डॉल्फिन्स बघण्यासाठी तसेच आरामासाठी हॉटेलकडून पुरविण्यात आलेले क्रुज ही काही खास वैशिष्टे.
राजबाग बीचवर असलेले हे हॉटेल पालोलेम बीच पासून हे रेसोर्ट ड्राईव्ह करत अवघ्या १५ मिनिटांच्या अंतरावर आहे. कोलवा आणि बेनौलीम बीच रेसोर्टपासून ४० कि.मी.च्या अंतरावर आहे. मनोरंजक पर्यटन आकर्षणे जसे सहकारी मसाल्याचे फार्म्स आणि पोंडा मंदिरे म्हाळसा आणि मंगुयेशी अनुक्रमे ४० आणि ६० कि.मी. अंतरावर आहेत. कोतीगाव अभयारण्य हे अवश्य भेट द्यावी असे ठिकाण आहे.
विमानतळ: ६३ कि.मी. / १ तास ३० मिनिटे. मारगोवा रेल्वे स्थानक: ३१.७ कि.मी. / ३५ मिनिटे.
वैशिष्टे:
रेजुवा, हा एक समग्र स्पा असून तेथे सुगंधी, आयुर्वेदिक आणि हर्बल चिकित्सा उपलब्ध आहेत.[३] गोल्फ शौकिनांसाठी ४० एकराच्या विस्तीर्ण परिसरात असलेले ९ होल गोल्फ कोर्स उपलब्ध आहे. फिटनेसच्या बाबतीत दक्ष असणाऱ्यांसाठी उत्तम असा फिटनेस क्लब आहे तसेच त्यांच्यासाठी स्विमिंग, टेनिस, स्क्वाश आणि जॉगिंगचीही सुविधा आहे.[४] येथे असलेला बँक्वेट हॉलची ५५० लोकांची आसनव्यवस्था असून रेसोर्टकडून लग्नाच्या इतर आवश्यक सुविधाही पुरविल्या जातात. येथे असलेल्या शॉपिंग सेंटरमधून लोक भेटवस्तू विकत घेऊ शकतात. ग्राहकांच्या सुविधेसाठी येथून विमानतळापर्यंत शटल सेवा पुरविण्यात येते.
खोल्या
रेसोर्टमध्ये २५५ वातानुकुलीत खोल्या, २३८ समुद्रदर्शनी आणि बगिच्यादर्शनी सूट्स, १४ आलिशान सूट्स आणि ३ प्रेसिडेन्शिअल सूट्स आहेत.[५] सगळ्या खोल्यांमध्ये मिनी बार, खाजगी बाथरूम, रंगीत टीव्ही, टेलिफोन, फ्रीज, हेअर ड्रायर, आणि वृत्तपत्र असतात.