Jump to content

लदोगा सरोवर

लदोगा सरोवर  
लदोगा सरोवर -
लदोगा सरोवर -
स्थान वायव्य रशिया (लेनिनग्राद ओब्लास्तकॅरेलिया)
गुणक: 61°00′N 31°30′E / 61.000°N 31.500°E / 61.000; 31.500गुणक: 61°00′N 31°30′E / 61.000°N 31.500°E / 61.000; 31.500
प्रमुख अंतर्वाह स्विर नदी, वोल्खोव नदी, वोक्सी नदी
प्रमुख बहिर्वाह नेव्हा नदी
पाणलोट क्षेत्र २,७६,००० वर्ग किमी
भोवतालचे देश रशिया ध्वज रशिया
कमाल लांबी २१९ किमी (१३६ मैल)
कमाल रुंदी १३८ किमी (८६ मैल)
पृष्ठभागाचे क्षेत्रफळ १७,७०० चौ. किमी (६,८०० चौ. मैल)
सरासरी खोली ५१ मी (१६७ फूट)
कमाल खोली २३० मी (७५० फूट)
पाण्याचे घनफळ ८३७ किमी (२०० घन मैल)
उंची ५ मी (१६ फूट)
स्कँडिनेव्हियाच्या नकाशावर लदोगा सरोवर

लदोगा सरोवर (रशियन: Ла́дожское о́зеро; फिनिश: Laatokka) हे युरोप खंडामधील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. रशियाच्या वायव्य भागात सेंट पीटर्सबर्ग शहराजवळ लेनिनग्राद ओब्लास्तकॅरेलिया ह्या विभागांमध्ये स्थित आहे. एकूण १७,८९१ चौरस किमी पृष्ठभागाचे क्षेत्रफळ असलेले लदोगा जगातील १४व्या क्रमांकाचे मोठे सरोवर आहे.

रशियामधील अनेक लहान-मोठ्या नद्या लदोगाला येऊन मिळतात. नेव्हा ही नदी लदोगामधून उगम पावणारी नदी सेंट पीटर्सबर्ग शहरामध्ये फिनलंडच्या आखाताला मिळते. रशियामधील अनेक कृत्रिम कालव्यांद्वारे बाल्टिक समुद्रापासून लदोगामार्गे वोल्गा नदीपर्यंत जलवाहतूक शक्य आहे.

बाह्य दुवे