लज्जागौरी (ग्रंथ)
लज्जागौरी | |
लेखक | रामचंद्र चिंतामण ढेरे [१] |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | विविध माहितीपर |
प्रकाशन संस्था | श्रीविद्या प्रकाशन [२] |
प्रथमावृत्ती | १९७८ |
चालू आवृत्ती | ८/२०११ चौथी आवृत्ती पद्मगंधा प्रकाशन [३],[४] |
विषय | मातृदेवतेच्या मूर्तीची रचना आणि भारतीय संस्कृतीतील तिचे महत्त्व, पूजनाच्या पद्धती यातील परंपरांचा चिकित्सक अभ्यास. |
पृष्ठसंख्या | २७२ |
मातृदेवतेच्या मूर्तीची रचना आणि भारतीय संस्कृतीतील तिचे महत्त्व, पूजनाच्या पद्धती यातील परंपरांचा चिकित्सक अभ्यास.मूर्ती-शिल्प-चित्र ते मराठी वाक्प्रचार ‘लंकेची पार्वती’ म्हणले जाते, अंग झाकण्याएवढे वस्त्रही जवळ नसलेल्या स्त्रीला उद्देशून. कैलासराणा शंकराची पत्नी पार्वती रावणाच्या लंकेत कशी व समजा गेलीच तर आपल्या आराध्य दैवताच्या सहचारिणीला रावण असा विपन्नावस्थेत राहू देणे शक्य आहे का? मराठीतल्या एका साध्या वाक्प्रचारातून हे प्रश्न उभे करत ही लंकेची पार्वती नसून लंजा (नग्न) गौरी-लज्जागौरी आहे, निर्मितीचे पूजास्थान आहे, एक फार मोठा सांस्कृतिक कालखंड या दैवताने व्यापला होता, असा हा प्रवास पुरावे देत ढेरे यांनी या ग्रंथात मांडला.[५][६]
हेही पाहा
- रामचंद्र चिंतामण ढेरे
- लज्जागौरी
संदर्भ
- ^ इरसिक डॉट कॉमदिनांक ८ नोव्हे २०११ रोजी सकाळी ११.५५ वाजता जसे दिसले
- ^ http://granthalaya.org/cgi-bin/koha/opac-detail.pl?biblionumber=640271
- ^ इरसिक डॉट कॉमदिनांक ८ नोव्हे २०११ रोजी सकाळी ११.५५ वाजता जसे दिसले
- ^ http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=170867:2011-07-16-17-36-30&catid=55:2009-07-20-04-00-45&Itemid=13 [मृत दुवा]
- ^ "विश्वास दांडेकर -लोकसत्ता लेख १७ फेब्रू २०१० रोजी जसा दिसला". 2016-03-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-02-17 रोजी पाहिले.
- ^ http://www.rcdhere.com/Lajjagauri/Lajjagauri_1.html Archived 2012-04-23 at the Wayback Machine. राचिढेरे डॉट कॉम (इंग्रजी मजकुर)] दिनांक ८ नोव्हे २०११ रोजी सकाळी ११.५५ वाजता जसे दिसले