Jump to content

लचित बोडफुकन

लचित बोडफुकन (२४ नोव्हेंबर १६२२ - २५ एप्रिल १६७२) हा अहोम राज्यामधील एक हिंदू सेनापती. हे राज्य सध्याच्या आसाम, भारत येथे आहे, इ.स.१६७१ च्या सराईघाटच्या लढाईत त्याच्या चतुर नेतृत्वासाठी ओळखला जातो. सराईघाटच्या लढाईत मुघल साम्राज्याच्या बलाढ्या सैन्यावर लचितच्या नेतृत्वाखाली असलेल्या हिंदू सैन्याने मोठा विजय मिळवला होता. लचित बोरफुकन हा मोमाई तामुली बोरबरुआचा सर्वात धाकटा मुलगा होता, जो वरच्या- आसामचा पहिला बोरबरुआ आणि हिंदू राजा प्रताप सिंहाच्या अधिपत्याखालील अहोम सैन्याचा सेनापती होता . त्यांचा जन्म चरैदेव येथे अहोम कुटुंबात झाला. चक्रध्वज सिंहाने त्याची बोरफुकन म्हणून निवड केली होती.

इस्लामी आक्रमण

मीर जुमलाच्या आक्रमणामुळे विखुरलेल्या हिंदू लोकांचे योग्य पुनर्वसन करण्यात आले , अन्न आणि लष्करी उत्पादनात वाढ करण्यात आली, नवीन किल्ले बांधण्यात आले आणि लछित बरफुकन या नवीन सेनापतीच्या नेतृत्वाखाली एक मोहीम सैन्य तयार करण्यात आले.

मुघलांवर विजय

लचित बोडफुकन कालियाबोर, बोरफुकनचे जुने राज्य, हा त्याचा तळ तळ बनवला आणि ब्रह्मपुत्रेच्या दोन्ही तीरांसह गुवाहाटीकडे गमन केले. उत्तर किनाऱ्यावरील फुकनने सप्टेंबर १६६७ च्या सुरुवातीला बहबरी हे गाव परत मिळवले. दक्षिण किनाऱ्यावर, कपिली नदी आणि गुवाहाटी दरम्यानचे काजली, सोनापूर, पानीखैती आणि तितामारा किल्ले ताब्यात घेतले. त्यानंतर अहोम हिंदू सैन्य गुवाहाटीला पोहोचले. येथे पाच बुरूज केलेब्रह्मपुत्रेच्या प्रत्येक तीरावर (उत्तर-कनई-बोरोसी-बोवा, हिलार, हिंदुरीघोपा, पाटदुआर आणि कोराई; दक्षिण-लतासिल, जोइदुआर, धरमदुर, दुआरगुरिया आणि पांडू) रक्षण करत होते. पण शूर अहोमांनी शहराच्या उत्तरेकडील शाह बुरुझ आणि रंगमहाल किल्ले ताब्यात घेतले. इटाखुली किल्ल्यासाठी मोठी लढाई झाली. इटाखुली येथे मुघलांनी हिंदू जनतेवर मोथे अत्याचार करत हिंदूंचा छळ चालविला होता. अहोमांनी जोइदुआरला वेढा घातला, ताबा मिळवला आणि मुघलांची फौज असूनही ते इटाखुलीजवळ आले. इ.स. १६६७ च्या रात्री एक मोठा हल्ला करण्यात आला. चातुर्याने रणनीती आखून शिडीने भिंती वर चढून त्या पाडल्या गेल्या. दोन महिन्यांच्या वेढा घातल्यानंतर नोव्हेंबर १६६७ च्या मध्यात मुस्लिम सैन्याच्या ताब्यात असलेली इटाखुली पडली. यावेळी अत्याचार करत असलेल्या सैन्याचा शोधून शोधून वध केला गेला.अनेकांनी आत्मसमर्पण केले परंतु एक काही जण पळून जाण्यात यशस्वी झाले. युद्धाचा खजिना आणि युद्धसाहित्य अहोम लचित बोडफुकनच्या हाती पडले. लचित बोरफुकनचा स्वतःचा भाऊ आणि उत्तराधिकारी बोरफुकन, लालुक सोला याने १६७९ मध्ये मुघलांसाठी गुवाहाटी सोडले. १६८२ पर्यंत ते मुघलांकडे राहिले, जेव्हा गदाधर सिंहाच्या नेतृत्वाखालील हिंदू अहोमांनी ते परत मिळवले आणि कामरूपमधील मुघलांचे इस्लामिक नियंत्रण कायमचे संपवले.

लचित बोडफुकन पुरस्कार

आजही वीरता दाखवलेल्या जवानांना लचित बोडफुकन पुरस्कार दिला जातो. इ.स. २०१० मध्ये कॅप्टन जिंटू गोगोई यांना मरणोत्तर लचित बोडफुकन पुरस्कार प्रदान केला. कारगिल युद्धात देशासाठी लढताना कॅप्टन गोगोई शहीद झाले होते. [] लचित बोरफुकन सुवर्णपदक - राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या सर्वोत्कृष्ट उत्तीर्ण कॅडेटला १९९९ पासून दरवर्षी लचित बोडफुकन पुरस्कार सुवर्णपदक प्रदान केले जाते. तसेच महाबीर लचित पुरस्कार आसाममधील उल्लेखनीय व्यक्तींना प्रदान केला जातो.

  1. ^ Reporter, Staff (2010-09-15). "Lachit Award posthumously to Jintu Gogoi". assamtribune.com (इंग्रजी भाषेत). 2022-09-28 रोजी पाहिले.