Jump to content

लघुसद्धांतकौमुदी मधील विसर्गसंधींचा अल्प परिचय

संधि म्हणजे जोड. दोन भिन्न शब्द एकत्र जोडण्याच्या क्रियेला संधि म्हणतात. असे करताना पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण एकत्र जोडून संधी केली जाते. स्वर संधी, व्यंजन संधि आणि विसर्ग संधि असे या संधीचे तीन पप्रकार आहेत. यातील विसर्ग संधिचा अल्प परिचय लघुसिद्धांतकौमुदीतील काही सूत्रांप्रमाणे दिला आहे. विसर्ग संधि - विसर्गाच्या पुढे ( पुढील शब्दात ) स्वर किंवा व्यंजन वर्ण आला असताना संधि करायची असेल तर विसर्गाच्या होणाऱ्या विकाराला विसर्ग संधि असे म्हणतात. लघुसिद्धांतकौमुदीमध्ये विसर्ग संधिचे अनेक प्रकार विविध सूत्रांतून सांगीतलेले आहेत. १. सूत्र - विसर्जनीयस्य सः

      अर्थ - विसर्गच्या पुढे खर् प्रत्याहारातील वर्ण आल्यास ( म्हणजे कठोर व्यंजन आल्यास ) विसर्गाच्या जागी स् आदेश होतो. 
      उदाहरण - विष्णूः + त्राता = विष्णूस्त्राता 

२. सूत्र - वा शरि

      अर्थ -  विसर्गच्या पुढे खर् प्रत्याहारातील शर् म्हणजे श्, ष् आणि स् हे तीन वर्ण आल्यास विसर्गाच्या जागी विसर्गच कायम राहतो. 
      उदाहरण - हरिः + शेते = हरिः शेते 

३. सूत्र - अतो रोरप्लुतादप्लुते

      अर्थ - प्लुत नसलेल्या ह्र्स्व अकराच्या पुढे जर ऋ आला किंवा प्लुत नसलेला ह्र्स्व अ आला तर ऋ ऐवजी उ आदेश होतो. 
      उदाहरण - शिवस् + अर्च्यः = शिवोर्च्यः 

४. सूत्र - हशिच

      अर्थ - अप्लुत ह्रस्व अच्या पुढे ऋ असेल आणि त्यापुढे जर हश् प्रत्याहारातील वर्ण आला असेल तरीही ऋचा उ होतो. 
      उदाहरण - शिवस् + वन्द्यः = शिवो वन्द्यः 

५. सूत्र - हलि सर्वेषाम्

      अर्थ - सर्वेषाम् म्हणजे सर्व आचार्यांच्या मते, भो, भगो, अघो आणि अ ज्याच्या पूर्वी आहेत अशा यकारच्या पुढे व्यंजन असताना यचा लोप करावा. 
      उदाहरण - भोस् + देवाः = भोर् + देवाः ( ससजुषो रुः ) = भोय् + देवाः ( भोभागोअघोअपूर्वस्ययोऽशि ) = भो देवाः 

अशा प्रकारे विसर्गाच्या पुढे वर्ण आला असता ( विसर्गाच्या जागी र् आणि र्च्या जागी विसर्ग ) नवा वर्ण तयार होतो. विसर्गाचा विकार होतो. त्या संधिस विसर्ग संधि असे म्हणतात.