लघुग्रह
लघुग्रह म्हणजे अवकाशात सूर्याभोवती फिरणारे सूर्यमालेतील लहान आकाराचे व कमी वस्तुमानाचे ग्रह. मंगळ व गुरू या ग्रहांदरम्यानच्या रिकाम्या जागेत लघुग्रहांचा पट्टा आहे. ग्रहांच्या निर्मिती काळात ग्रह बनण्यात अपयशी ठरलेले लहान-लहान खडक म्हणजे लघुग्रह.