लक्ष्मीविलास रस
लक्ष्मीविलास रस तथा लक्ष्मीविलास गुटी एक आयुर्वेदिक औषध आहे.
घटक
- अभ्रकभस्म,
- पारा,
- गंधक व चिकणा,
- नागबला,
- शतावरी,
- भुई कोहळा,
- काळा धोतरा इत्यादींची बीजे
समभाग आणि सर्वांच्या अष्टमांश सोने यांच्या चूर्णास विड्याच्या पानाच्या भावना देऊन हा तयार करतात.
ही गुटी रसायन असून स्त्रियांना पुत्रदायक, अपस्मार, उन्माद, श्वास, खोकला, उचकी इ. रोगांवर उपयुक्त आहे. ही गुटी एका वैद्यपरंपरेत अंतकाळी देण्याची पद्धती आहे. हिने घाम कमी होतो, नाडी बलवान होते, श्वास कमी होतो व मृत्युसंकट टळते.