Jump to content

लक्ष्मीनारायण (कविता)

लक्ष्मीनारायण ही वा. रा. कांतांची एका दैवतकथेवर (Myth) आधारलेली कविता आहे. जन्मजन्मांतरीही टिकून राहणाऱ्या अमर प्रीतीचे रूप या कवितेतून व्यक्त झाले आहे. एका खेड्यात लिंब आणि पिंपळ एकमेकात उगवलेले होते. हे दृश्य पाहून लोकमानसात एका दैवतकथेने जन्म घेतला. हा जोडवृक्ष म्हणजे देशमुख घराण्यातील एक स्त्री आणि तिच्याशी लग्न होऊ न शकल्याने जोगी बनलेला तिचा प्रियकर - ही लोकभावना येथे काव्यविषय बनली आहे. हृदय कल्पना व मनाला व्याकुळ करणारी प्रवाही कथा येथे भावकवितेचे रूप घेते. दैवतकथेला भावगीताचे रूप देण्याचा हा मराठी कवितेतील अभिनव प्रयत्न आहे.