लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर
लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर | |
---|---|
जन्म | लक्ष्मण २० जून, इ.स. १८६९ गुर्लहोसूर |
मृत्यू | सप्टेंबर २६, इ.स. १९५६ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
नागरिकत्व | भारतीय |
पेशा | संचालक, किर्लोस्कर समूह |
प्रसिद्ध कामे | किर्लोस्कर समूह |
अपत्ये | शंतनुराव किर्लोस्कर |
वडील | काशिनाथ किर्लोस्कर |
लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर (लकाकि) ( २० जून, इ. स. १८६९ - २६ सप्टेंबर, इ. स. १९५६) हे मराठी, हे भारतीय उद्योजक होते. ते किर्लोस्कर उद्योग समूहाचे संस्थापक होते.
इ.स. १८८८ साली त्यांनी बेळगावात सायकल दुरुस्तीचे दुकान थाटत व्यावसायिक क्षेत्रात आपले पहिले पाऊल टाकले. शेतीसाठी त्यांनी बनवलेले लोखंडी नांगर हे पुढे विस्तारलेल्या किर्लोस्कर समूहाचे पहिले उत्पादन होते. किर्लोस्करवाडी येथे त्यांनी इ.स. १९१० साली कारखाना काढला; तसेच कारखान्यातील कर्मचाऱ्यांसाठी औद्योगिक वसाहत स्थापन केली.
त्यांच्यानंतर किर्लोस्कर समूहाची धुरा त्यांचे पुत्र शंतनुराव किर्लोस्कर यांनी सांभाळली.
बाह्य दुवे
- "किर्लोस्कर समूहाच्या शताब्दी सोहळ्यांतर्गत स्मारक टपालतिकिटाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने घेतलेला आढावा" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)