Jump to content

लक्ष्मण पांडुरंग जगताप

लक्ष्मण पांडुरंग जगताप (१५ फेब्रुवारी, १९६३ - ३ जानेवारी, २०२३) हे महाराष्ट्रातील राजकारणी होते. हे चिंचवड मतदारसंघातून २००९, २०१४ आणि २०१९मध्ये विधानसभेवर निवडून गेले.[] यांपैकी जगताप यांनी २००९ मध्ये अपक्ष तर इतर दोन वेळेस भाजपकडून निवडणूक लढवली. या दरम्यान २०१४मध्ये त्यांनी शेकापकडून लोकसभा निवडणूकही लढवली. त्यात त्यांचा पराभव झाला.[]

३ जानेवारी २०२३ रोजी त्यांचा कर्करोगाने मृत्यू झाला.[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Profile on MyNeta site". 25 April 2014 रोजी पाहिले.
  2. ^ "List of Contesting candidate - phase II" (PDF). Chief Electoral Officer, Maharashtra. p. 3. 25 April 2014 रोजी पाहिले.
  3. ^ Blow to BJP in Pune as influential MLA Laxman Jagtap passes away