लँग्टन रुसेरे
लँग्टन रुसेरे (७ जुलै, १९८५:मास्विंगो, झिम्बाब्वे - हयात) हे झिम्बाब्वेचे क्रिकेट पंच आहेत.
त्यांचा पंच म्हणून पहिला सामना हा १९ जुलै २०१५ रोजी झिम्बाब्वे वि भारत असा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना होता. तर त्यांचा पंच म्हणून पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना २४ ऑक्टोबर २०१५ रोजी झालेला झिम्बाब्वे वि अफगाणिस्तान हा सामना होता.
त्यांनी आत्तापर्यंत २०१८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०१८ क्रिकेट विश्वचषक पात्रता, २०१८ महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आणि २०२० महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक ह्या आयसीसीच्या स्पर्धांमध्ये पंचगिरी केली आहे.