रोसेटा (अंतराळयान)
युरोपीय अवकाश संस्थेने रोसेटा अवकाश मोहिम आखली होती. ६७ पी/च्युरयुमोव- गेरासिमेन्को धूमकेतू या वर फिली अवतरक उतरवणे हा या मोहिमेतील महत्त्वाचा भाग होता. या मोहिमेत अमेरिकेच्या नासा या संस्थेचाही सहभाग आहे. या मोहिमे अंतर्गत रोसेटा मोहिमेत धूमकेतूच्या गाभ्यापासून शेपटीपर्यंतच्या भागाचा अभ्यास केला जाणार आहे. १२ नोव्हेंबर २०१४ मध्ये पोहोचलेले रोसेटा हे यान ६७ पी/च्युरयुमोव- गेरासिमेन्को या धूमकेतूला प्रदक्षिणा घालते आहे. या मोहिमेची सुरुवात २ मार्च २०१४ मध्ये झाली. इ.स. २०१४ मध्ये रोसेटा यान धूमकेतूच्या कक्षेत पोहोचले. सौरमालेची निर्मिती कशी झाली, पृथ्वीची निर्मिती कशी झाली व धूमकेतूंमधून जीवसृष्टी पृथ्वीवर आली काय, अशा प्रश्नांची उत्तरे मिळवण्या साठी ही मोहिम आखली गेली आहे.
नाव
रोसेटा स्टोन या पुरातन इजिप्त येथील दगडावरून युरोपीय अवकाश संस्थेने रोसेटा अवकाश मोहिम हे नाव दिले. लंडनच्या ब्रिटिश संग्रहालयात हा रोसेटा स्टोन ठेवलेला आहे. या दगडातून प्राचीन इजिप्तची संस्कृती उलगडण्यास मदत होते.