रोशनी शर्मा
रोशनी शर्माने वयाच्या १६व्या वर्षी गाडी चालवायचा परवाना नसताना बेकायदेशीररीत्या पहिल्यांदा फटफटी (मोटारसायकल) चालवली. पुढे मोठी झाल्यावर तिने फटफटीवरून कन्याकुमारी ते काश्मीर हा प्रवास एकटीने केला. [१]
प्रवास
रोशनी शर्माच्या एका मित्राने त्याच्या उत्तर भारतापासून ते दक्षिण भारतापर्यंतच्या प्रवासाविषयी तिला सांगितले, तेव्हा तिच्यात या आव्हानात्मक रस्त्यावरून गाडी चालवण्याची ईर्षा निर्माण झाली, व तिने हा प्रवास पूर्ण केला. यापूर्वी भारतातील कुठल्याही स्त्रीने असा प्रवास करण्याचे धाडस दाखवले नव्हते.[२]
संदर्भ
- ^ Verma, Sreshti. "Meet the First Indian Female Biker to Ride Solo From Kanyakumari to Kashmir". Tripoto (इंग्रजी भाषेत). 2019-05-24 रोजी पाहिले.
- ^ deekshatripathi. "Meet Roshni Sharma The First Indian Woman Biker to Ride Solo From Kanyakumari to Kashmir". WonderfulWoman (इंग्रजी भाषेत). 2019-03-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-05-24 रोजी पाहिले.