Jump to content

रोशनी थिनकरन

रोशनी थिनकरन एक National Geographic तसेच TED Global यांची शिष्यवृत्ती धारक आहे . एक तरुण, धाडसी डॉक्यूमेंटरी चित्रपट निर्माती म्हणून ती प्रसिद्ध आहे. ती मुळात श्रीलंका येथील असून नंतर ती युनायटेड स्टेट्स येथे राहात आहे.[] तिने चित्रपट निर्मितीत स्त्री केंन्द्री लघुपटांची निर्मिती केली आहे.

चरित्र

रोशनी थिनकरनचा जन्म श्रीलंकेचा , पण ती वयाच्या सातव्या वर्षी अमेरिकेला गेली .[] त्यावेळी चालू असलेल्या श्रीलंकेतील यादवी युद्धामुळे तिचे कुटुंब अमेरिकेत स्थलांतरित झाले.[] थिनकरन हिने जॉर्ज मेसन विद्यापीठात शिक्षण घेतले.[] तिने MS in Real Estate and Finance ही पदवी प्राप्त केली. रोशनी श्रीलंका आणि सिंगापूर येथे Plurogen Therapeutics साठी प्रकल्प प्रमुख म्हणून काम करत होती. कंपनीच्या त्या त्या भागातील पार्टनरसाठी ती काम करत असे. तसेच तिने US-media company साठी काम केले आहे.[]

काम

रोशनीने Ellen Johnson Sirleaf, अध्यक्ष, लायबेरिया यांच्यावर पहिला लघुपट केला होता .[] ह्या चित्रपटाची लांबी खूपच लहान होती, पण National Geographic या मान्यवर संस्थेचे लक्ष तिने आपल्याकडे खेचून घेतले ."[] त्यामुळे ती National Geographic Society's Emerging Explorers Programची भाग बनली. आणि तिला $10,000चे अनुदान प्राप्त झाले.[]

तिने तिचे लक्ष इराक, लायबेरिया, लेबनॉन आणि अफगाणिस्तान येथील संघर्षाला सामोरे जाणाऱ्या महिलांचे जगणे या विषयातील संशोधन करणे आणि त्यांचे चरित्रचित्रण यावर केंद्रित केले. [] तिने 2005 मध्ये, एक मल्टिमिडीया प्रकल्प करतांना महिलांच्या दृष्टिकोनातून युद्धाचे विश्लेषण केले.[] रोशनीने 14 महिने इराक आणि आजूबाजूचे परिसर यामध्ये वास्तव्य करून Women at the Forefront याची निर्मिती केली.[] या चित्रपटातून तिने, जुलुम आणि त्रासावर मात करत उभ्या राहिलेल्या कणखर महिला चळवळींना जगासमोर आणले.

What Was Promised (2008) या तिच्या माहितीपटात तिने , अमेरिकेच्या पुढाकाराने इराकी महिलांना इराकी सुरक्षा बल यामध्ये समाविष्ट केले गेले त्यावर भाष्य केले.[] त्याचा पहिला प्रयोग National Geographic All Roads Film Project याच्या अंतर्गत सादर करण्यात आला.[]

रोशनीच्या कामाचा भर युद्धाने उद्धवस्त झालेल्या प्रदेशांवर दिला आहे. तिच्या आजवरच्या प्रवासातून तिने आयुष्यातल्या संकटावर मात करणाऱ्या, आपल्या कुटुंबाला आधार असणाऱ्या, स्वतःचे निवासप्रदेश अधिक सक्षम करणाऱ्या स्त्रियांची व्यक्तिचित्रे चित्रपटातून साकारली आहेत. ती म्हणते की , आपल्या देशामध्ये वेगळे काम करून, ज्या मुले आणि मुली दोन्हींसाठी उदाहरण समोर ठेवत आहेत, अशा स्त्रियांना जगासमोर आणून महिलांना सजग करणे हे तिच्या कामामागचे उद्दिष्ट आहे. जर आज आपण माणसांना योग्य ते शिक्षण आणि शिकवण देऊन सक्षम केले नाही तर समाज मोडून पडतील.

चित्रपट

  • महिला आघाडीवर (2005)
  • काय वचन दिले होते (2008)
  • प्रवास OnEarth (चित्रपट मालिका, 2011)[]

संदर्भ

  1. ^ a b Johnson, Michelle (November 2007). "Viewing War Through Women's Eyes". World Literature Today. 81 (6): 10–12. 22 December 2015 रोजी पाहिले. Unknown parameter |subscription= ignored (सहाय्य)
  2. ^ a b c d Sklarew, Renee (September 2009). Northern Virginia Magazine. Missing or empty |title= (सहाय्य); |access-date= requires |url= (सहाय्य)
  3. ^ https://www.linkedin.com/in/roshini-thinakaran-16077a37. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ a b Rayasam, Renuka (1 October 2008). Washingtonian. Missing or empty |title= (सहाय्य); |access-date= requires |url= (सहाय्य)
  5. ^ a b "संग्रहित प्रत". 2016-09-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-11-26 रोजी पाहिले.
  6. ^ http://www.nationalgeographic.com/explorers/bios/roshini-thinakaran/. Missing or empty |title= (सहाय्य)
  7. ^ Hristova, Stefka (2012). "Abu Ghraib: A Ghostly Story". In de Matos, Christine; Ward, Rowena (eds.). Gender, Power, and Military Occupations: Asia Pacific and the Middle East Since 1945. New York: Routledge. p. 192. ISBN 9780415891837.
  8. ^ Howley, Andrew. "संग्रहित प्रत". 2015-12-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-11-26 रोजी पाहिले.

बाह्य दुवे