Jump to content

रोबोकॉन इंडिया

रोबोकाॅन इंडिया २०१७, पुणे

आशिया-पॅसिफिक ब्रॉडकास्टिंग युनियन (ABU) द्वारे रोबोकॉन (रोबोटिक काॅनटेस्टचे संक्षिप्त) आयोजित केले जाते, जो आशिया पॅसिफिक प्रदेशातील २० हून अधिक देशांचा समुह आहे. जपान याआधीच राष्ट्रीय स्तरावर अशा स्पर्धा आयोजित करत आहे आणि २००२ मध्ये पहिल्या आंतरराष्ट्रीय रोबोकॉन स्पर्धेचे यजमान देखील बनले आहे. तेव्हापासून, दरवर्षी सदस्य प्रसारकांपैकी एक या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाचे आयोजन करतो.

प्रत्येक सहभागी देशाचे प्रसारक( broadcasters ) आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्यांच्या देशाचे प्रतिनिधित्व करतील अशा संघाची निवड करण्यासाठी राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करतात. अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी या स्पर्धेत सहभाग घेऊ शकतात. सहभागी संघांनी त्यांच्या स्वतःच्या रोबोटची रचना आणि निर्मिती करणे अपेक्षित आहे,आणि प्रशिक्षक, टीम लीडर, मॅन्युअल रोबोट ऑपरेटर आणि स्वयंचलित रोबोट ऑपरेटरसह त्यांचे संघ तयार करणे.

दूरदर्शन, राष्ट्रीय सार्वजनिक सेवा प्रसारक दरवर्षी राष्ट्रीय रोबोकॉन स्पर्धा आयोजित करते आणि विजेत्या संघाला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते. २००२ मध्ये पहिली रोबोकॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये आयआयटी कानपूरमध्ये तीन महाविद्यालयातील फक्त चार संघ सहभागी झाले होते. बालेवाडी, पुणे येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या बॉक्सिंग मैदानात झालेल्या इंडियन नॅशनल रोबोकॉन २०१२ मध्ये ही संख्या ६६ आणि २०१८ मध्ये १०७ वर पोहोचली होती. २००८ आणि २०१४ मध्ये भारत हा आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा यजमान होता. २०२२ मधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन हे दूरदर्शन आणि आयआयटी दिल्ली यांनी नवी दिल्ली येथे केले आहे.

स्पर्धा

ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


वर्ष यजमान शहर आयोजक थीम आंतरराष्ट्रीय विजेता भारत राष्ट्रीय विजेता[][]भारतीय स्पर्धा सह आयोजित[][]
२००२ जपान तोक्यो, जपानNHK Reach for the Top of Mount Fuji व्हियेतनाम हो ची मिन्ह सिटी युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी भारत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, निरमा विद्यापीठ आयआयटी कानपूर
२००३ थायलंड बँकॉक, थायलंडMCOT Takraw Space Conqueror थायलंड Sawangdandin Industrial and Community Education College भारत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, निरमा विद्यापीठ निरमा विद्यापीठ, अहमदाबाद
२००४ दक्षिण कोरिया सोल, दक्षिण कोरियाKBS Reunion of Separated Lovers, Gyeonwoo & Jiknyeo व्हियेतनाम हो ची मिन्ह सिटी युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी भारत विवेकानंद एज्युकेशन सोसायटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी निरमा विद्यापीठ, अहमदाबाद
२००५ चीन बीजिंग, चीनचायना सेंट्रल दूरचित्रवाणी Climb on the Great Wall Light the Holy Fire जपान तोक्यो विद्यापीठ भारत आयआयटी मुंबई एमआयटी, कोथरूड पुणे
२००६ मलेशिया क्वालालंपुर, मलेशियाRTM Building the World's Tallest Twin Tower व्हियेतनाम हो ची मिन्ह सिटी युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी भारत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, निरमा विद्यापीठ एमआयटी, कोथरूड पुणे
२००७ व्हियेतनाम हनोई, व्हियेतनामव्हिएतनाम दूरचित्रवाणी (VTV) Halong Bay Discovery चीन शिआन जिओटाॅंग विद्यापीठ भारत आयआयटी दिल्ली एमआयटी, कोथरूड पुणे
२००८ भारत पुणे, भारतदूरदर्शनगोविंदा चीन शिआन जिओटाॅंग विद्यापीठ भारत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, निरमा विद्यापीठ एमआयटी, कोथरूड पुणे
२००९ जपान तोक्यो, जपानNHK Travel Together for the Victory Drums चीन Harbin Institute of Technology भारत आयआयटी मद्रास एमआयटी स्कुल ऑफ टेक्निकल मॅनेजमेंट, पुणे आणि एमआयटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग, पुणे
२०१० इजिप्त कैरो, इजिप्तERTU Robo-Pharaohs built pyramids चीन University of Electronic Science and Technology of China भारत एमआयटी पुणेएमआयटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग, पुणे
२०११ थायलंड बँकॉक, थायलंडMCOT Loy Krathong, Lightning Happiness with friendship थायलंड Dhurakij Pundit University भारत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, निरमा विद्यापीठ एमआयटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग, पुणे
२०१२ हाँग काँग हाँगकाँगRTHK Peng On Dai Gat (In pursuit of peace and prosperity) चीन University of Electronic Science and Technology of China भारत एमआयटी पुणे[]एमआयटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग, पुणे
२०१३व्हियेतनाम दा नांग, व्हियेतनामव्हिएतनाम दूरचित्रवाणी (VTV) द ग्रीन प्लॅनेट जपान Kanazawa Institute of Technology भारत एमआयटी पुणेएमआयटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग, पुणे
२०१४भारत पुणे, भारतदूरदर्शनए सल्युट फाॅर पॅरेंटहुड (पालकत्वाला सलाम) व्हियेतनाम लॅक हाँग युनिवर्सिटी भारत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, निरमा विद्यापीठ एमआयटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग, पुणे
२०१५इंडोनेशिया योगकर्ता, इंडोनेशियाइंडोनेशियाबॅडमिंटनव्हियेतनाम Hung Yen University of Technology and Education भारत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, निरमा विद्यापीठ एमआयटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग, पुणे
२०१६थायलंड बँकॉक, थायलंडModernine TV/MCO क्लीन एनर्जी रिचार्जिंग द वर्ल्ड मलेशिया Universiti Teknologi Malaysia भारत वडोदरा अभियांत्रिकी महाविद्यालय, कोटंबी, वडोदरा एमआयटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग, पुणे
२०१७जपानतोक्यो, जपानNHK द लॅंडिंग डिस्क[]व्हियेतनाम लॅक हाँग युनिवर्सिटी भारत अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे (CoEP) एमआयटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग, पुणे
२०१८व्हियेतनाम निन्ह बिन्ह, व्हियेतनामव्हिएतनाम दूरचित्रवाणी (VTV) द फ्लाइंग ड्रॅगन व्हियेतनाम लॅक हाँग युनिवर्सिटी भारत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, निरमा विद्यापीठ एमआयटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग, पुणे
२०१९ मंगोलिया उलानबातर, मंगोलिया[]Mongolian National Broadcaster ग्रेट उर्तु हाँग काँग द चायनीज युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँग भारत लालभाई दलपतभाई अभियांत्रिकी महाविद्यालय, अहमदाबाद (LDCE) आयआयटी दिल्ली
२०२० फिजी सुवा, फिजीरोबो रग्बी ७s जपान तोक्यो विद्यापीठ (कोविड-१९ महामारीमुळे ऑनलाइन स्पर्धा झाली) भारत एमआयटी पुणेआयआयटी दिल्ली
२०२१ चीन जिमो, चीनथ्रोईंग अॅरोज् इन्टु पाॅट्स इंडोनेशिया Sepuluh Nopember Institute of Technology (कोविड-१९ महामारीमुळे ऑनलाइन स्पर्धा झाली) भारत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, निरमा विद्यापीठ आयआयटी दिल्ली
२०२२ भारत नवी दिल्ली, भारतदूरदर्शनलगोरी भारत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, निरमा विद्यापीठ []आयआयटी दिल्ली

चित्र दालन

रोबोकाॅन इंडिया २००८
रोबोकाॅन इंडिया २००८  
रोबोकाॅन इंडिया २००९
रोबोकाॅन इंडिया २००९  
रोबोकाॅन इंडिया २०१०
रोबोकाॅन इंडिया २०१०  
रोबोकाॅन इंडिया २०११
रोबोकाॅन इंडिया २०११  
रोबोकाॅन इंडिया २०१३
रोबोकाॅन इंडिया २०१३  
रोबोकाॅन इंडिया २०१७
रोबोकाॅन इंडिया २०१७  
रोबोकाॅन इंडिया २०१८
रोबोकाॅन इंडिया २०१८  
रोबोकाॅन इंडिया २०१९
रोबोकाॅन इंडिया २०१९  


बाह्य दुवे

रोबोकॉन इंडिया Archived 2022-03-19 at the Wayback Machine.

संदर्भ

  1. ^ a b Wayback Machine (2013-08-31). "History of Robocon India". 2013-08-31 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2020-06-17 रोजी पाहिले.
  2. ^ a b Wayback Machine (2017-04-24). "History of Robocon India". 2017-04-24 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2020-06-17 रोजी पाहिले.
  3. ^ Pune institute’s team wins Robocon 2012
  4. ^ ABU ROBOCON 2017 TOKYO THEME & RULEBOOK THE LANDING DISC
  5. ^ "ABU ROBOCON 2019" (PDF). aburobocon2019.mnb.mn/ (इंग्रजी भाषेत). 2019-06-27 रोजी पाहिले.
  6. ^ Jul 18, Shradha Chettri / TNN / Updated:; 2022; Ist, 11:38. "Break and build! Robocon champs eye global glory | Delhi News - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2022-07-19 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)