Jump to content

रोपवाटिका

रोपवाटिका

रोपाची वाढ आणि संगोपन केले जाते त्या जागेला रोपवाटिका असे म्हणतात.भारतात रोपवाटिकांचा व्यवसाय फार जुना आहे. रोपवाटिकेतून जातीवंत रोपाची, कलमाची आणि बियाणाची उत्पत्ती, रोपाचे शास्त्रोक्ट पद्धतीने संगोपन व संवर्धन निरनिराळ्या अभिवृद्धीतून एकत्रित समुहाने केलेले असते. तिला रोपवाटिका असे म्हणतात. अलिकडे फुलझाडांचा, फळझाडांचा व्यवसाय किफायतशीर होत असल्यामुळे फळझाडांची मागणी वाढत आहे. त्या प्रमाणात जातिवंत रोपांची शास्त्रीयादृष्ट्या निपज मोठ्या प्रमाणात होत नाही. परिणामी कमी दर्जाची कलमे / रोपे पुरविली जाण्याची शक्यता असते. याकरिता रोपवाटिकांची संख्या व गुणात्मक वाढ झाली पाहिजे.

सुरुवात

रोपवाटिकेची सुरुवात करण्यासाठी प्रथम आपणास शासनाकडून परवानगी घ्यावी लागेल. परवानगी घेतल्यानंतर आपण रोपवाटिकेचा व्यवसाय सुरू करू शकतो. ज्या विभागात फळझाडांच्या लागवडीस वाव आहे . त्या भागात अशाच फळपिकाच्या रोपवाटिका शासनाने स्थापन केलेल्या आहेत. जेणे करून कलमीकरणाचा कार्यक्रम राबविणे शक्य होईल. राज्यात संत्री, मोसंबी, चिकू, आंबा, वगळता इतर फळपिकाच्या खुंटाचे अद्याप्रमाणे करणे झालेले नाही. भविष्यात यामध्ये संशोधन झाल्यास रोगमुक्त बागा स्थापन करणे, लागवडीचे अंतर कमी करणे, बागेचे उत्पादन लवकर सुरू करणे इ. बाबी साध्या होऊन उत्पादन वाढीस मोठ्या प्रमाणावर चालना मिळू शकते.

पद्धत

रोपवाटिका म्हणजे रोपे खुल्या शेतात किंवा जागेत वाढू शकतात, कंटेनर फील्डवर, बोगदे किंवा हरितगृहामध्ये खुल्या जागेवर ,नर्सरी सुशोभित झाडं, झुडूप आणि ज्यात वनऔषधी लावल्या आहेत, विशेषतः घाऊक व्यापारासाठी लागणारे रोपे किंवा सुशोभित रोपवाटिका वाढतात. कंटेनरफिल्ड रोपवाटिका मध्ये लहान झाडं, झुडूप आणि ज्यात वनऔषधी लावल्या आहेत अशा वनस्पती असतात, जे सहसा उद्यान केंद्रांमध्ये विकण्यासाठी असतात. रोपवाटिका, काचेचे बांधकाम किंवा प्लॅस्टिकच्या बोगदांमध्ये रोपांची लागवड करणे हे कठोर हवामान (विशेषतः दंव) पासून तरुण वनस्पतींचे संरक्षण करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. जेव्हा प्रकाश आणि वायु जीवन प्रवेशाची परवानगी देणे, आधुनिक हरितगृह तापमान, वायुवीजन आणि प्रकाश आणि अर्ध-अर्ध-स्वयंचलित खाद्यपदार्थ म्हणून वापरतात.

महत्त्व

  • रोपावरील किडी व रोगाचे नियंत्रण करणे सोईचे होते.
  • रोपावर शास्त्रीय अभिवृद्धी करता येते. उदा. डोळे भरणे, भेट कलम, गुटी कलम करणे इत्यादी.
  • रोपांना पाणी, खते वेळेवर देऊन चांगली वाढविता येतात.
  • उत्पादनक्षम व जातीवंत फळझाडांची कलमे व रोपे तयार करता येतात.
  • सावकाश वाढ होणाऱ्या झाडाचे रोपवाटिकेत चांगल्याप्रकारे संगोपन करून ती लागवडीसाठी वापरता येतात.
  • कमी जागेत मोठ्या प्रमाणावर रोपे तयार करता येतात.
  • रोपांचे संगोपन चांगल्या प्रकारे होते.

संदर्भ

https://en.wikipedia.org/wiki/Plant_nursery