Jump to content

रोनित रॉय

रोनित रॉय
रोनित रॉय लव्हयात्री च्या सेट वर
जन्म

रोनित बोस रॉय[]
११ ऑक्टोबर, १९६५ (1965-10-11) (वय: ५८)

[]
नागपूर, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेता
भाषा बंगाली
प्रमुख चित्रपट जान तेरे नाम
प्रमुख टीव्ही कार्यक्रम कसौटी जिंदगी की
वडील ब्रोटिन बोस रॉय
आई डॉली रॉय
पत्नी जोआना
नीलम सिंग (ल. २००३)
अपत्ये
धर्म हिंदू

रोनित बोस रॉय (जन्म:११ ऑक्टोबर, १९६५, नागपूर) हे एक भारतीय अभिनेता आहेत, ज्यांनी प्रामुख्याने हिंदी दूरचित्रवाहिनी मालिका आणि चित्रपटांत मोठ्या प्रमाणावर काम केले. रॉय यांनी त्यांच्या कारकिर्दीत एक फिल्मफेअर पुरस्कार, [] दोन स्क्रीन पुरस्कार, पाच आयटीए पुरस्कार आणि सहा भारतीय टेली पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळवले आहेत.

वैयक्तिक आयुष्य

रॉय यांचा जन्म ११ ऑक्टोबर १०६५ रोजी नागपुरात बंगाली कुटुंबात झाला. [] ते उद्योगपती ब्रोटिन बोस रॉय आणि डॉली रॉय यांचा मोठा मुलगा आहे. [] त्यांचा धाकटा भाऊ रोहित रॉय देखील एक टीव्ही अभिनेता आहे. रोनित रॉय यांचे बालपण अहमदाबाद, गुजरातमध्ये गेले. [] बाल अभिनेता आयुष सरकारच्या वडिलांसोबत त्यांनी शालेय शिक्षण येथेच केले. त्यांनी अहमदाबादच्या अंकुर शाळेतून प्राथमिक शिक्षण घेतले. शालेय शिक्षणानंतर रॉय यांनी हॉटेल व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. शिक्षण पूर्ण झाल्यावर ते मुंबईत आले आणि चित्रपट निर्माते सुभाष घई यांच्या घरी राहिले. [] रॉय चित्रपटसृष्टीत काम करण्यास उत्सुक असताना, सुभाष घई यांनी त्यांना चित्रपट सृष्टीतील येणाऱ्या अडचणींमुळे काम न करण्याचा सल्ला दिला. रोनित मुंबईच्या सी रॉक हॉटेलमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून काम करत होते. वेगवेगळ्या स्तरांवरील अनुभव घेण्यासाठी, त्यांनी डिश-वॉशिंग आणि क्लिनिंगपासून टेबल सर्व्हिंग आणि बार-टेंडिंगपर्यंत सर्व प्रकारची कामे केली होती. []

कारकीर्द

दूरचित्रवाणी कारकीर्द

रॉय यांना बालाजी टेलिफिल्म्सकडून कम्माल या दूरचित्रवाणी मालिकेत भाग घेण्यासाठी निमंत्रण आले. [] त्यावेळी कोणत्याही चांगल्या मोठ्या चित्रपटाच्या संधी नसल्यामुळे त्यांनी या मालिकेत काम सुरू करण्याची संधी स्वीकारली. याचे चित्रीकरण सुरू होण्यापूर्वी बालाजी टेलिफिल्म्सने रॉयला कसौटी जिंदगी की साठी ऋषभ बजाज या एक मध्यमवयीन बिझनेस टायकून ची भूमिका देऊ केली. या भूमिकेमुळे त्यांना बालाजी टेलिफिल्म्सच्या क्यूंकी सास भी कभी बहू थीमध्ये अमर उपाध्याय आणि इंदर कुमारच्या जागी मिहिर विराणीची भूमिका मिळाली. []

इस २००९ - २०११ पर्यंत, त्यांनी NDTV इमॅजिनच्या बंदिनीमध्ये धर्मराजची भूमिका साकारली, कधीही पराभूत न होणाऱ्या क्रूर आणि निर्दयी हिरे व्यापाऱ्याच्या या भूमिकेसाठी त्यांना प्रशंसा मिळवून दिली. [१०]

इस २००७ मध्ये रॉय यांनी झलक दिखला जा हा डान्स वास्तव प्रदर्शनी मालिका आणि २००८ मध्ये ये है जलवा या दुसऱ्या शोमध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला आहे. त्यांनी २०१० मध्ये किचन चॅम्पियन्स मालिकेचे आयोजन केले होते जे कलर्स टीव्हीवर होते.

अदालतच्या 400 भागांच्या सोहळ्यात रोनित रॉय.

इस २०१० मध्ये, रॉय यांनी सोनी टीव्हीच्या लोकप्रिय कोर्टरूम ड्रामा शो अदालतमध्ये केडी पाठक; सत्यासाठी लढा देणारा एक धारदार अनोखा वकील म्हणून काम केले.

इस २०१४ मध्ये त्यांनी परत बालाजी टेलिफिल्म्सच्या ' इतना करो ना मुझे प्यार ' मध्ये डॉ. नचिकेत खन्ना, उर्फ नील के सोबत पल्लवी कुलकर्णीच्या भूमिकेतून परत छोट्या पडद्यावर काम केले.

इस २०१६ मध्ये, त्यांनी अदालत (सीझन 2) मध्ये काम केले जिथे त्यांनी आपल्या मागील सीझनमधील पात्राची भूमिका पुन्हा निभावली.

चित्रपट कारकीर्द

रॉयने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण जान तेरे नाम (१९९२) या चित्रपटाद्वारे केले. हा चित्रपट व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी ठरला. त्यांनी बॉम्ब ब्लास्ट (१९९३) मध्ये आदित्य पांचोली आणि किशोरी शहाणे यांच्यासोबत काम केले. [११] हा चित्रपट देखील व्यावसायिक यश देऊन गेला.

टीव्हीवरील यशानंतर, रॉयने विविध हिंदी चित्रपटांमध्ये सहायक भूमिकांमध्ये काम केले. २०१० मध्ये, त्याने समीक्षकांनी प्रशंसित चित्रपट उडान मध्ये भूमिका केली; त्याच्या कामाची खूप प्रशंसा झाली आणि त्याला अनेक पुरस्कार मिळाले. फिल्म कम्पॅनियनने दशकातील १०० सर्वोत्कृष्ट कामगिरीमध्ये रॉयच्या कामगिरीला स्थान दिले. [१२]

उडान चित्रपटाद्वारे रॉयने पुन्हा बॉलीवूड मध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी अनुराग कश्यपच्या दॅट गर्ल इन यलो बूट्स, करण जोहरचा स्टुडंट ऑफ द इयर, दीपा मेहताचा मिडनाइट्स चिल्ड्रन, संजय गुप्ताचा शूटआउट अॅट वडाळा ( एकता कपूर निर्मित), आणि अनुराग कश्यपच्या अगली चित्रपटांमध्ये काम केले .

इस २०१३ मध्ये, रॉय यांनी अक्षय कुमार स्टारर BOSS मध्ये मुख्य विरोधी भूमिका केली होती. तसेच २०१४ मध्ये त्यांनी 2 स्टेट्समध्ये केलेल्या भूमिकेची खूप प्रशंसा झाली होती. [१३]

२०१७ मध्ये, रॉय यांनी हृतिक रोशन सोबत काबिल या थ्रिलर चित्रपटात विरोधी भूमिका निभावली होती . [१४] त्याच वर्षी त्यांनी एनटीआर जूनियर सोबत जय लावा कुसा या चित्रपटातून काम करत तेलुगु चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. [१५] याशिवाय त्यांनी मशीन (२०१७), लखनऊ सेंट्रल (२०१७) आणि लवयात्री (२०१८) यांसारख्या चित्रपटांमध्ये देखील काम केले. [१६]

त्यानंतर रॉय यांनी पुरी जगन्नाध दिग्दर्शित रोमँटिक स्पोर्ट्स चित्रपट लिगरमध्ये काम केले. यात विजय देवराकोंडा, अनन्या पांडे, रम्या कृष्णन आणि मकरंद देशपांडे यांच्या देखील भूमिका आहेत . [१७]

वेब सिरीज

इस २०१८ मध्ये, रॉय, मोना सिंग आणि गुरदीप कोहली यांच्यासह ALTBalaji च्या 'कहने को हमसफर हैं ' या वेब सीरिजमधून डिजिटल क्षेत्रात पदार्पण केले.

इस २०१९ मध्ये, रॉय ने एका भारतीय क्राइम थ्रिलर वेब सिरीज होस्टेजमध्ये काम केले.

व्यवसाय उपक्रम

रॉय यांच्याकडे एस सुरक्षा आणि संरक्षण एजन्सी (AceSquad Security Services LLP) आहे. ही एजन्सी सध्या सलमान खान, अमिताभ बच्चन, मिथुन चक्रवर्ती, शाहरुख खान आणि आमिर खान यांसारख्या बॉलीवूड कलाकारांना संरक्षण पुरवते ; इंडियन प्रीमियर लीगचे माजी अध्यक्ष आणि माजी आयुक्त ललित मोदी आणि त्यांचा मुलगा रुचिर मोदी यांना देखील सुरक्षा पुरवली होती. एस सिक्युरिटी आणि प्रोटेक्शनने काही चित्रपट प्रकल्पांना देखील त्यांची सेवा दिली आहे ज्यात लगान, दिल चाहता है, यादें, ना तुम जानो ना हम, साथिया, आणि अरमान या चित्रपटांचा समावेश होतो. [१८]

वैयक्तिक जीवन

रोनित रॉय आणि नीलम सिंग-रॉय (२०१२)

रॉयचे पहिले लग्न जोआना नावाच्या एका महिलेशी झाले होते आणि त्यांना ओना नावाची मुलगी झाली. [१९] [२०]

२५ डिसेंबर २००३ रोजी, त्यांनी अभिनेत्री आणि मॉडेल नीलम सिंग यांच्याशी लग्न केले. या जोडप्याला त्यांना एक मुलगी आडोर (जन्म मे २००५) आणि मुलगा अगस्त्य (जन्म ऑक्टोबर २००७) आहे. []

अभिनय सूची

चित्रपट

Films that have not yet been releasedअद्याप प्रदर्शित न झालेले चित्रपट
वर्ष चित्रपट भूमिका भाषा नोंद
१९८९ राम लखनहिंदी सहाय्यक दिग्दर्शक
१९९२ जान तेरे नामसुनील पदार्पण चित्रपट
१९९३ १५थ ऑगस्ट (१९९३ चित्रपट)विक्रम चौधरी,
गाता रहे मेरा दिल दिलीप एस. नाईक जानेवारी २०२१ मध्ये प्रदर्शित झाला
सैनिकविजय घई
तहकीकतरमेश
बनसोधरबंगाली
जय माँ वैष्णव देवीहिंदी
हलचलकरण
रॉक डान्सरराकेश
१९९६ जुर्मानासंजय सक्सेना
मेघाप्रकाश
आर्मीगॅविन
दानवीरविशाल श्रीवास्तव
१९९९ जालसाजराकेश
अग्निशिखाप्रदिप्ता रॉय बंगाली
२००० ग्लॅमर गर्लसुनील वर्मा हिंदी
२००१ हम दिवाने प्यार केविजय चॅटर्जी
खतरों के खिलाडीबांबस
२००३ शेष बोंगसोदर (शेवटचे वंशज)बोंगसोदर बंगाली
२००३ रोक्तोबोंध आनंद
२००५ निशाण - द टार्गेटहिंदी
किसना: द वॉरिअर पोएटजिमी पाहुणे कलाकार
२००९ लक बाय चान्सस्वतः पाहुणे कलाकार
२०१० पंखपीटर डी'कुन्हा पाहुणे कलाकार
उडानभैरव सिंग सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार
२०११ दॅट गर्ल इन यलो बुटपाहुणे कलाकार
२०१२ मिडनाईट चिल्डरेनअहमद सिनाई
स्टुडंट ऑफ द इयरप्रशिक्षक करण शहा
२०१३ शूट आउट ऍट वडाळाइन्स्पेक्टर राजा आंबट
बॉसआयुष्मान ठाकूर
२०१४ २ स्टेटविक्रम मल्होत्रा नामांकन, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्यासाठी फिल्मफेर पुरस्कार
अगलीशौमिक बोस
२०१५ गुड्डू रंगीलाबिल्लू पहेलवान नकारात्मक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी स्टार स्क्रीन अवॉर्ड
२०१६ डोंगरी का राजामन्सूर अली
२०१७ काबिलमाधवराव शेलार
सरकार ३गोकुळ साटम
मशीनबलराज थापर
जय लवा कुसासरकार तेलुगू तेलुगू पदार्पण
मुन्ना मायकलमायकल हिंदी
लखनौ सेंट्रलराजा श्रीवास्तव
२०१८ लवयात्रीसॅम पटेल "समीर"
ठग्स ऑफ हिंदोस्तानमिर्झा सिकंदर बेग
२०१९ लाईन ऑफ डिसेंटपृथ्वी सिन्हा OTT प्लॅटफॉर्म ZEE5 वर रिलीज
डंबोहोल्ट फॅरियर (आवाज) डब केलेली आवृत्ती; कॉलिन फॅरेल साठी
अर्जुन पटियालाआयपीएस अमरजीत सिंग गिल
२०२१ भूमीरिचर्ड चाइल्ड तमिळ तमिळ पदार्पण; Disney+ Hotstar वर रिलीज
Shamshera daggerहिंदी चित्रीकरण
Liger daggerतेलुगु



हिंदी
द्विभाषिक चित्रपट

दूरचित्रवाहिनी

फिक्शन शो

वर्ष मालिका भूमिका नोट्स संदर्भ
१९९७ बॉम्बे ब्लूदिलीप भट्ट कॅमिओ
१९९९ बात बन जाए1 भाग
१९९९ नागीनरोनित
२००० सुराग1 भाग
२००२-२००३ कमलस्वयम
२००२-२००८ कसौटी जिंदगी कीश्री. ऋषभ बजाज
२००३-२००८ क्यूंकी सास भी कभी बहू थीमिहीर विराणी
२००३ शश्श्श्...कोई है
२००४ कहना है कुछ मुझेइशान मसंद
२००४ विक्राल आणि गब्रालएपिसोडिक भूमिका
२००४ कृष्ण अर्जुनअण्णा/विजय एपिसोडिक भूमिका
२००५ काव्यांजलीमयंक नंदा कॅमिओ
२००५ सरकर - रिश्तों की अनकही कहानीकुणाल वीर प्रताप सिंग
२००६-२००९ कसम सेअपराजित देब
२००७ कयामतइंदर शाह
२००८ कहानी हमारे महाभारत कीभीष्म
२००९-२०११ बंदिनीधर्मराज मह्यवंशी
२०१०-२०१५ अदालतअधिवक्ता के.डी.पाठक
२०१४-२०१५ इतना करो ना मुझे प्यारडॉ. नील के/ नचिकेत खन्ना
२०१६ अदालत (सीझन 2) अधिवक्ता के.डी.पाठक
२०१६ 24 (सीझन 2)रॉय पाहुणे कलाकार
२०१९ नागीन ३रोहित मेहरा पाहुणे (कहने को हमसफर हैं 2 च्या प्रमोशनसाठी)
२०१९ शक्ती - अस्तित्व के एहसास कीअधिवक्ता रजत सिंग
२०१९ ये रिश्ते हैं प्यार केएसपी पृथ्वी सिंग पाहुणे कलाकार
२०२२ स्वरण घरकंवलजीत बेदी

नॉन-फिक्शन शो

वर्ष मालिका भूमिका नोट्स
२००७ कॉफी विथ करण (सीझन 2)अतिथी भूमिका
२००७ झलक दिखला जास्पर्धक
२००८ ये है जलवास्पर्धक
२००८ तिकीट टू बॉलिवूडनृत्य
२००८ आजा माही वेन्यायाधीश
२००९ बेगम्स ड्रॉईंग रूमअतिथी भूमिका
२०१० किचन चॅम्पियनयजमान नामांकित- सर्वोत्कृष्ट अँकरसाठी इंडियन टेली अवॉर्ड (2010)
२०१३ कॉमेडी नाइट्स विथ कपिलअतिथी कलाकार
२०१५ डील या नो डीलयजमान
२०१७ कपिल शर्मा शोअतिथी भूमिका
२०२१ जुर्म और जज्बातयजमान

वेब सिरीज

वर्ष मालिका भूमिका प्लॅटफॉर्म नोट्स
२०१८-२०२० कहने को हमसफर हैंरोहित मेहरा ALTBalaji, ZEE5
२०१९-२०२० हॉस्टेजपृथ्वी सिंग डिस्ने + हॉटस्टार
२०२१ ७ कदमअरबिंदो इरॉस नाऊ
२०२१ कँडी जयंत पारेख वूट

वादविवाद

२७ ऑक्टोबर २०११ रोजी, रोनित रॉयला मुंबईच्या आंबोली उपनगरात रस्त्यावरील अपघातात मुंबई पोलिसांनी धोकादायक आणि निष्काळजीपणाने गाडी चालवल्याबद्दल अटक केली होती. रॉय एका दिवाळीच्या पार्टीवरून परतत असताना त्यांच्या मर्सिडीज कारने वॅगन-आरला धडक दिली होती, ज्यात एक व्यक्ती गंभीर जखमी झाला होता. परंतु, काही तासांतच त्यांना जामीन मिळाला आणि सुटका झाली होती. प्राथमिक वैद्यकीय अहवालात रोनित रॉयच्या पोटात कोणत्याही मादक पदार्थाचे सेवन केल्याचे आढळले नाही.

संदर्भ

  1. ^ "Ronit Bose Roy – Official Instagram Handle". 23 September 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 16 August 2020 रोजी पाहिले.साचा:Primary source inline
  2. ^ a b "Birthday Special: A look back at Ronit Roy's journey, that's worth penning down in golden words". The Indian Express. 11 October 2017. 24 July 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 12 March 2020 रोजी पाहिले.
  3. ^ "Filmfare winners of the year 2011". Filmfare Awards. 4 February 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 27 November 2019 रोजी पाहिले.
  4. ^ "Rohit Roy remembers his late father; elder brother Ronit says 'you have me'". The Times of India. 8 October 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 20 March 2018 रोजी पाहिले.
  5. ^ "I don't want to be back-stabbed anymore: Ronit Roy". The Times of India. 18 April 2014. 19 April 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 19 April 2014 रोजी पाहिले.
  6. ^ a b "Ronit Roy Biography". Ronit Roy (official fan page). 14 September 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 8 February 2013 रोजी पाहिले.
  7. ^ "Ronit Roy About". India Forums (इंग्रजी भाषेत). 11 October 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2 June 2020 रोजी पाहिले.
  8. ^ "I don't want to insult TV industry. It's like my mother: Ronit Roy". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 4 June 2016. 4 June 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 4 June 2020 रोजी पाहिले.
  9. ^ Rao, Soumya (27 May 2019). "A show where 'nothing is what it seems to be': Ronit Roy and Tisca Chopra on web series 'Hostages'". Scroll.in (इंग्रजी भाषेत). 21 August 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 4 June 2020 रोजी पाहिले.
  10. ^ "Ronit Roy". timesofindia.com. Times of India. 8 July 2021. 5 August 2021 रोजी पाहिले.
  11. ^ "Ronit Roy Biography". Ronit Roy (official fan page). 14 September 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 8 February 2013 रोजी पाहिले.
  12. ^ "100 Greatest Performances of the Decade". 100 Greatest Performances of the Decade (इंग्रजी भाषेत). 19 December 2019 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 26 November 2019 रोजी पाहिले.
  13. ^ "Boss Movie Review {3/5}: Critic Review of Boss by Times of India". The Times of India. 11 May 2020 रोजी पाहिले.
  14. ^ "Kaabil Review {4/5}: Hrithik has what it takes to be Kaabil". The Times of India. 11 May 2020 रोजी पाहिले.
  15. ^ "Ronit Roy to play antagonist in Jai Lava Kusa". NDTV. 22 June 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 22 June 2017 रोजी पाहिले.
  16. ^ "Lucknow Central Movie Review: Farhan Akhtar Can't Rock On Behind Bars". NDTV.com. 11 August 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 11 May 2020 रोजी पाहिले.
  17. ^ "Vijay Deverakonda and Ananya Panday starrer Liger to release on September 9, 2021". Bollywood Hungama (इंग्रजी भाषेत). 11 February 2021. 23 February 2021 रोजी पाहिले.
  18. ^ "Ace Security and Protection". Ace Security and Protection. 31 August 2012 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 8 February 2013 रोजी पाहिले.
  19. ^ "Ronit Roy opens up about his strained relationship with eldest daughter". India Today (इंग्रजी भाषेत). Ist. 30 September 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 30 September 2019 रोजी पाहिले.
  20. ^ Pal, Divya (May 15, 2011). "'I've missed 20 years of my daughter's life'". The Times of India (इंग्रजी भाषेत). 3 April 2022 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
  • इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील रोनित रॉय चे पान (इंग्लिश मजकूर)