रोधक
विद्युतप्रवाह रोधणाऱ्या, अर्थात विद्युतप्रवाहास अडथळा आणणाऱ्या, घटकाला रोधक (इंग्लिश: Resistor, रेझिस्टर ;) म्हणतात. रोधकातून विद्युतप्रवाह वाहवण्यासाठी त्याच्या टोकांदरम्यान विद्युतदाब लावावा लागतो. रोधकाच्या विद्युतप्रवाह रोधण्याची क्षमतेला रोध असे म्हणतात. विद्युतदाब, विद्युतप्रवाह व रोध यांचा संबंध ओहमाच्या नियमानुसार खालील सूत्रात मांडला जातो :
वरील सूत्रात "V म्हणजे विद्युतदाब, "I" म्हणजे विद्युतप्रवाह, "R" म्हणजे रोध आहे.
रोधकाचा रोध ओहम या एककात मोजला जातो. ओहम एकक Ω या चिन्हाने दर्शवतात.
प्रमुख प्रकार
अचल रोधक
ज्या रोधकांचा रोध बदलता येत नाही, सदैव स्थिर असतो, त्यांना अचल रोधक (इंग्लिश:Fixed resistors) म्हणतात.
- कार्बन कंपोझिशन (इंग्लिश:Carbon composition)
- कार्बन फ्लिम (इंग्लिश:Carbon film)
- मेटल ऑक्साइड (इंग्लिश:Metal oxide)
- सिऱ्यामिक (इंग्लिश:ceramic)
- वायरवाउंड (इंग्लिश:Wire wound)
चल रोधक
ज्या रोधकांचा रोध बदलता येतो, त्यांना चल रोधक (इंग्लिश:Variable resistors) म्हणतात.
- प्रिसेट(इंग्लिश:preset)
- पोटॅनशीओमिटर(इंग्लिश:potentiometer)
मानरेखनाच्या पद्धती
रोधकाचा रोध ओहम या एककात मोजतात. कार्बन कंपोझिशन, कार्बन फिल्म, मेटल ऑक्साइड ह्या प्रकारातील रोधक हे आकारमानाने अतिशय लहान असल्यामुळे त्यावर त्याचे मान छापणे कटकटीचे व खर्चिक होते; त्यामुळे अशा प्रकारच्या लहान रोधकावर त्याचे मान इलेक्ट्रॉनिक रंगसंकेत पद्धतीने छापले जातात.