रोडरोलर
रोडरोलर (यास रस्त्यावरील खडी दाबण्याचे यंत्र असेही म्हणतात किंवा फक्त रोलर) हे मानवनिर्मित मातीकाम, खडीकरण, फाड्या(दगड), डांबर, काँक्रीट इत्यादीचे रस्ता वा पायव्यादरम्यान दाबकाम करण्यासाठीचे अभियांत्रिकी वाहन आहे.
जगातील काही भागात अद्यापपावेतो रोडरोलरला त्याच्या प्रणोदनाच्या पद्धतीस दुर्लक्षुन स्टीम रोलरच म्हणतात, कारण तो सर्वप्रथम वाफेच्या जोरावर चालत (वाफचलित) असे.
प्रणोदन[विशिष्ट अर्थ पहा]
इतिहास
पहीला रोलर हा घोड्याद्वारे ओढण्यात येणारा रोडरोलर होता.त्याचा वापर बागकामासाठी होत असे. कारण रोलरची परिणामकारकता त्याच्या वजनावर अवलंबुन असते म्हणुन १८व्या शतकाच्या मध्यानंतर घोड्याची जागा स्व-बलावर चालणाऱ्या वाहनांनी घेतली. असे प्रथम वाहन हे वाफचलित रोलर होय. दोन दट्टे असणाऱ्या अनुरेखनास पसंत केल्या जात असे. एकल दट्ट्याचे वाफचलित रोलर हे चलनबाह्य व सामान्यतः वापरले जात नव्हते कारण,त्याच्या वाफेच्या बलाच्या झटक्याने रस्त्यावर लाटासदृश्य अंकन होत असे. अमेरिकेतील काही कंपन्या १९५० च्या दशकात त्याचा वापर करीत असत तर इंग्लंड मध्ये त्याचा वापर १९७० च्या दशकापर्यंत सुरू होता.
जसजसे,२०व्या शतकात, अंतर्ज्वलन इंजिनांचे तंत्रज्ञान सुधारले,वाफचलित रोडरोलरची जागा घासलेट, पेट्रोल आणि डिझेल चलित इंजिनांनी घेतली. सर्वप्रथम निर्माण झालेला अंतर्ज्वलन इंजिनचलित रोडरोलर हा त्याच्या पूर्वीच्या वाफचलित रोडरोलर सदृष्यच होता. त्यांनी, इंजिनाची ताकद चाकांपर्यंत पोचण्यासाठी तीच(वाफेच्या इंजिनाची)स्पर गिअर[मराठी शब्द सुचवा] प्रक्षेपण प्रणाली वापरली. काही कंपन्याना ती प्रणाली आवडली नाही कारण त्या काळी काही घासलेटवर चालणारे रोलर हे सुरू होण्यास अत्यंत त्रासदायक असत.
सध्या, वापरात असलेले सर्व रोलर हे चालण्यासाठी डिझेलचाच वापर करतात.
उपयोग
रोडरोलर हे त्याचे वजन पृष्ठभाग दाबण्यासाठी वापरते. प्राथमिक स्तराची 'दबाई' ही हवा भरलेले टायर समोर व त्यामागे असणाऱ्या, दोन जोडगोळीच्या टायरद्वारे केली जाते. टायरची लवचिकता व चाकांच्या वर-खाली हालचालीस सुलभतेमुळे रोलरला खडबडीत पृष्ठभागांवरसुद्धा काम करणे सोपे होते. लोह-पिंप सदृष्य चाके असणाऱ्या रोलरचा त्यावर अंतीम हात फिरविल्यामुळे मग गुळगुळीत व समतल पृष्ठभाग तयार होतो. रोलर हे भरावाच्या दबाईसाठीही वापरले जातात. अशा यंत्रांच्या चाकांना विशिष्ट असे गुटके असतात (शीपफुट-मेंढखुर). त्याने पृष्ठभाग गुळगुळीत होत नाही. या मेंढखुर सदृष्य गुटक्यांच्या अल्प क्षेत्रफळामुळे रोलरचे वजन त्याठिकाणी एकवटुन चांगली दबाई होते.
वेगवेगळे आकारमान
रोलर हे एका साध्या १०० पाउंड लोह-पिंप सदृष्य चाकास एका माणसाद्वारे ओढण्याची सोय असणारे यापासुन ते २० मेट्रिक टन वजन असलेले, बसुन चालविता येण्याजोगे व पुढे ५४ टन वजनाचे या पर्यंतही असु शकतात. काही रोलरच्या चाकात त्याचे वजन वाढविण्यासाठी पाणी भरण्याचीसुद्धा सोय असते.
प्रकार
- मानवचलित व स्व-बलरहीत,
- मानवचलित स्व-बलावर चालणारे
- नालीच्या भरावासाठी- मानवचलित वा सुदूर नियंत्रणाचे
- बसुन चालविता येण्यायोग्य
- बसुन चालविता येण्यायोग्य-वळविण्याची सोय असलेले
- हादरे देणारे (कंपनकारी)
- हवा भरलेल्या टायरचे
- ट्रॅक्टरचलित (एकमेव व आगळेवेगळे)
चित्रदालन
- स्वबलीत, हादरणारे,मागे-मागे चला पद्धतीचे (यावर बसण्याची सोय नसते)
- पर्यायाने लहान रोलर-वळविण्याजोगा व बसण्याची सोय असलेला.
- डावीकडील रोलरपेक्षा मोठा रोलर
- हादरणारा रोलर
- कॅटरपिलर कंपनीचा हादरणारा रोलर
- हवेच्या दाबाने नियंत्रित-प्राथमिक कामासाठीचा रोलर
- भारताच्या ग्रामिण भागातील एक ट्रॅक्टरचलित रोलर
- रोड रोलरच्या संग्रहालयातील एक नग
लोह-पिंप पद्धतीच्या चाकांचे प्रकार
याच्या दंडगोलांची रुंदी २४ ते ८४ इंच राहु शकते:
- मातीकामासाठीचा एकच दंडगोलाचा खुर/गुटके असणारा
- एक दंडगोल असलेला परंतु गुळगुळीत पृष्ठभागाचा (डांबरीकरणासाठी)
- दोन दंडगोलांचा मातीकामासाठीचा खुर/गुटके असणारा
- दोन दंडगोलांचा परंतु गुळगुळीत पृष्ठभागाचा(डांबरीकरणासाठी)
- तीन दंडगोलसंच असलेला व बुलडोझरचे पाते लावलेला (मातीच्या भरावासाठी)
वेगळेपण आणि अनेकविध स्वरूप
- काहींवर चाकात पाणी भरण्यासाठी सोय असते-अपेक्षित वजन प्राप्त करण्यासाठी
- हादरण्याऱ्या रोलरमुळे जास्तीची दबाई होउ शकते. यात त्याच्या चाकात मुक्तपणे फिरणाऱ्या, हादरे देणाऱ्या मोटर्स लागलेल्या असतात. त्यांच्या दांड्यास असंतुलीत वजने लावण्यामुळे ते हादरे उत्पन्न होतात.
- डांबर चाकास चिकटू नये म्हणुन काही रोलरचे पृष्ठभागास सतत पाण्याने ओले ठेवण्याची सोय असते.
- मानवचलित रोलरला एकच चाक असते.
- काही स्वयंचलित रोलरला तीन चाके असतात.एक समोर व दोन मागे. तर काहीला फक्त दोनच. काही रोलरला फक्त समोरचे चाकच लोखंडाचे असते व मागील चाले हवा भरलेल्या टायरची असतात.
चित्रपटातील हत्यार म्हणुन वापर
चित्रपट उत्पादकांना रोड रोलर फारच आवडतो. अनेक आंग्ल चित्रपटात त्याचा वापर केल्या गेला आहे.त्यपैकी काही चित्रपटः
- नेकेड गन
- हु फ्रेमड् रॉजर रॅबिट
- अ फिश कॉल्ड वांडा
वगैरे.
भारतीय दूरदर्शन
भारतातील दूरदर्शनवरील एक हास्य कलाकार जसपाल भट्टी यांना पण रोडरोलर फार आवडतो. त्यांनी त्यांच्या पत्नीस सरकारी वाहनात बसवुन नेण्याचे वचन तिला रोडरोलरवर फिरवुन आणुन पाळले.
बाह्य दुवे
- रोड रोलर असोशिएशनचे संकेतस्थळ Archived 2016-05-07 at the Wayback Machine.
लेखात प्रयुक्त संज्ञा
शब्दाचा विशेष संदर्भ/अर्थ छटा
प्रयूक्त शब्द | विशेष संदर्भ/अर्थ छटा |
3 | 4 |
इंग्रजी मराठी संज्ञा
Compaction | दाबकाम, दबाई |
soil | माती, मातीकाम |
Boulders | फाड्या (दगड) |
Bitumen/asphalt | डांबर |
Foundation | पायवा |
Powered | स्व-बल |
Internal combustion engine | अंतर्ज्वलन इंजिन |
Transmission | प्रक्षेपण |
Piston | दट्ट्या |
Design | अनुरेखन |
power impulses from the steam engine | वाफेच्या बलाचे झटक्याने |
metal-drum | लोह-पिंप सदृष्य |
knobb | गुटका |
sheeps-foot | मेंढखुर |
vibrating | हादरणारा |
kerosene | घासलेट |
articulating-swivel | वळविण्याची सोय असलेले |
propulsion | प्रणोदन |
इंग्रजी | मराठी |