Jump to content

रोझा लुक्संबुर्ख

‎रोझा लुक्संबुर्ख

रोझा लुक्संबुर्ख हिचा जन्म ५ मार्च १८७१ मध्ये मध्यमवर्गीय ज्यू कुटुंबात पोलंडमधील झामॉश्च या रशियाव्याप्त गावी झाला. ती पोलिश क्रांतिकारक आणि जर्मनीतील कम्युनिस्ट पक्षाची एक प्रमुख संस्थापीका होती . लहानपणापासून ती अशक्त व पंगू होती , वॉर्सा येथील कन्याशाळेत तिने सुरुवातीचे शिक्षण घेतले. त्या काळी फक्त झुरिक येथेच स्त्रियांना विद्यापीठात प्रवेश मिळत असल्याने तिने १८८९ मध्ये ह्या विद्यापीठात स्वित्झर्लंड येथे प्रवेश घेतला. तेथे तिने १८८९-९८ दरम्यान संशोधन करून ‘द इंडस्ट्रियल डेव्हलपमेन्ट ऑफ पोलंड’ हा प्रबंध सादर केला आणि १८९८ मध्ये डी. लिट्. ही पदवी मिळविली. त्यानंतर ती जर्मनीमध्ये गेली आणि सोशल डेमॉक्रॅटिक पक्षाचे कार्य तिने अंगीकारले. तिने गुस्टॉव्ह ल्युबेक याबरोबर काल्पनिक लग्नाचा घाट घालून तेथील नागरिकत्वही मिळविले. कार्ल कौटस्की याच्यासमवेत ती एस्. पी. डी. पक्षाच्या दुरुस्तीवादासंबंधीच्या वादविवादात सामील झाली. अल्पकाळातच त्यांच्या नेतृत्वाची छाप आंतरराष्ट्रीय समाजवादी चळवळीवर पडली. ते दोघे एदुआर्त बेर्नश्टाईन या पक्षनेत्याच्या विरोधात उभे राहिले.