Jump to content

रोझा देशपांडे

रोझा विद्याधर देशपांडे (जन्म : १९२९; - मुंबई, १९ सप्टेंबर २०२०) या मराठी लेखिका, साम्यवादी नेत्या आणि माजी खासदार होत्या. त्या श्रीपाद अमृत डांगे यांच्या कन्या होत. त्यांच्या पतीचे नाव विद्याधर लक्ष्मण देशपांडे (ऊर्फ बानी देशपांडे).. तेही एक मराठी लेखक होते. वेदान्त रहस्य हे त्यांचे प्रसिद्ध पुस्तक होय.

रोझा देशपांडे ह्या सन १९८० ते १९८७ च्यादरम्यान त्या कम्युनिस्ट पार्टीमध्ये सक्रिय होत्या. त्या पाचव्या लोकसभेच्या सदस्य होत्या. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (सीपीआय)च्या तिकिटावर उत्तर मध्य मुंबईतून त्यांनी खासदारकीची निवडणूक जिंकली होती.

रोझा देशपांडे यांनी लिहिलेली पुस्तके

  • एस. ए. डांगे : एक इतिहास